oto

मतदान साक्षरता अभियानात ऑटोचालक यांनी दिला मदतीचा हात

Spread the love

मतदान साक्षरता अभियानात ऑटोचालक यांनी दिला मदतीचा हात

ब्रँड अँबेसिडर विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात ऑटो चालकांनी केला संकल्प दिव्यांग मतदारांना देणार निशुल्क सेवा

अकोला ; स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे संस्थापक अध्यक्ष व मतदार साक्षरता अभियान जिल्हा अकोला चे ब्रँड अँबेसिडर विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात समाजातील विविध घटकांची जनजागृती केली जात असून 26 एप्रिल रोजी शंभर टक्के मतदान केले जावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांना मतदान केंद्रापर्यंत जाताना बऱ्याच अडचणी येतात त्यासाठी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे विविध सोयी उपलब्ध करून दिल्या जात आहेत . अग्रणी दूत डॉ. कोरडे यांच्या प्रेरणेतून अकोल्यातील ऑटो चालक व वाहनधारकांनी दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत निशुल्क सेवा देण्याचे अभिवचन दिले आहे.२६ एप्रिल २०२४ रोजी हे सर्व ऑटोधारक व वाहनचालक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या मार्गदर्शनात ज्या गरजू दिव्यांगांना मतदान केंद्रापर्यंत जावयाचे आहे त्यांना केंद्रापर्यंत पोहोचवणे व मतदान केल्यावर घरी पोहोचविणे अशी निशुल्क सेवा देणार आहेत .

या उपक्रमात दि.९ एप्रिल २०२४ रोजी शुध्योधन वानखडे,भारत कुंबलवार,विश्वास वासनिक,दादाराव पाटील,राजु इंगळे,मनिष भालेराव,चंद्रकांत तायडे,आनंद मेश्राम,गौतम चहांदे,संजय ढवळे,अरविंद पाटोळे,करण ठाकुर,बिरजु भाऊ,उमेश बुंदेले,संजय ढोले,उमेश माठे,बंडु मस्के,मुकेश गजबिये,सुनिल देशमुख,अनिल गजभिये,राजु डोमाळे,आकाश होरे, शहाजी तुपेरे,सुनिल गोपनारायण, दिनेश मेश्राम या ऑटोधारकांनी शपथ घेऊन आपले नाव दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला कडे नोंदवले आहे .

एवढेच नव्हे तर हे ऑटो चालक प्रवाशांना मतदान करण्याची विनंती ही करीत आहेत. *ज्या दिव्यांग मतदारांना ही सेवा हवी आहे त्यांनी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाच्या ९४२३६५००९० या हेल्पलाइन क्रमांकवर संपर्क साधावा असे आव्हान डॉ.कोरडे यांनी केले आहे.

अकोला जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अशी सेवा संस्थे तर्फे केली जाणार आहे.मतदान जनजागृतीपर अभियानात संस्थेचे सदस्य अनामिका देशपांडे, अस्मिता मिश्रा, सिद्धार्थ ओवे, गणेश सोळंके, संजय फोकमारे,विजय कोरडे, संजय तिडके,प्रतिभा काटे, अंकुश काळमेघ यांनी सहभाग नोंदविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *