पाणी जपून वापरा ; अकोला शहरातील पाणी पुरवठा राहणार बंद

Spread the love

अकोला शहरातील पाणी पुरवठा राहणार बंद ; सौर उर्जा प्रकल्‍प कार्यान्‍वीत करण्‍यासाठी ,पाणी पुरवठा विभाग मनपा प्रशासन 

अकोला दि. 27 एप्रिल 2024 – केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियान अंतर्गत जलशुद्धीकरण केंद्र महान येथे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी वीज पुरवठा तात्पुरता बंद ठेवणे आवश्यक असल्याने दि. 29 एप्रिल 2024 रोजी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा एक दिवसासाठी बंद राहील. त्यामुळे शहरातल्‍या पाणीपुरवठाच्‍या वेळापत्रकात तात्पुरता बदल होऊन संपूर्ण शहराला एक दिवस उशिराने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.असे आवाहन 27 एप्रिल रोजी 6 वाजून 34 मिनिटांनी मनपाचे कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग डोईफोडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *