अकोल्यात वादळी वारा: मंगरुळपीर रस्त्यावर विशालकाय वृक्ष कोसळले; वाहतूक बंद, वीज पुरवठा खंडित

Spread the love

अकोल्यात वादळी वारा: मंगरुळपीर रस्त्यावर विशालकाय वृक्ष कोसळले; वाहतूक बंद, वीज पुरवठा खंडित

जि.प.काॅलीनी समोरील रस्त्यावर विद्युत तारेसह मोठे झाड पडल्याने वाहतुक बंद ,वीज पुरवठा खंडित

वादळी वाऱ्यासह पाऊस होऊन खडकी अकोला येथील जि.प.काॅलनी समोर मंगरूळपीर रोडवर विद्युत तारेसह मोठे झाड पडुन वाहतुक बंद झाली आहे. वाहनांच्या रांगा लागुन वाहतुक ठप्प झाली आहे. यावेळी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनचे प्रमुख जिवरक्षक दीपक सदाफळे यांनी एका बाजूच्या डांगा तोडुन रस्त्याच्या कडेने वाहन जाण्यापुरता मार्ग मोकळा करून दिला आहे.

नॅशनल हायवेचे सहाय्यक अभियंता विनोद डहाळे यांना माहीती देवून जेसीबी मशीन पाठवुन देण्यासाठी सदाफळे यांनी विनंती केली आहे. अद्यापही पाऊस चालुच आहे,अशी माहीती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली 25 एप्रिल रोजी रात्री 10 वाजता च्या सुमारास दिली आहे.

 

 

 

अकोल्यात आज रात्री साडे आठच्या दरम्यान अवकाळी पावसाने हजेरी लावली. उद्या अकोल्यात लोकसभेसाठी मतदान पार पडणार आहे , याकरिता जय्यत तयारी प्रशासनामार्फत करण्यात आली आहे. मात्र, आता आलेल्या अवकाळी पावसामुळे आता चिंता व्यक्त केली जात आहे. जोरदार विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. तर शहरातील अनेक भागातील वीज पुरवठा सुद्धा खंडित झाला आहे. उद्या होणाऱ्या मतदानाच्या दृष्टीने वीज पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न केले जात आहे.

आमदार सावरकर यांनी घेतली दखल

अचानक वादळी मुळे अनेक ठिकाणी झाडे तसेच विजेचे खांबे पडल्यामुळे वीज, पुरवठा खंडित झाला आहे‌. वीज वितरण कंपनी यंत्रणा कामाला लागली असून, या संबंधित सूचना देण्याच्या संदर्भात आमदार रणधीर सावरकर यांनी अधिकाऱ्यांची संपर्क साधला.

यासंदर्भात जिल्हा प्रशासन बांधकाम विभाग तसेच वीज वितरण कंपनी, यांनी या संदर्भात दखल घेऊन कारवाई करण्याची सूचना केली आहे. उद्या निवडणूक मतदान असल्यामुळे मतदारांना दळणवळणाची असुविधा होऊ नये, यासंदर्भात लक्ष केंद्रित करण्यात यावा, अशा सूचना आमदार सावरकर यांनी दिल्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *