मनसे आक्रमक,महाकाली चौकात पोलिसांच्या टोइंग पथकाची गाड्या उचलण्याची कारवाई थांबवली

Spread the love

मनसे आक्रमक,महाकाली चौकात पोलिसांच्या टोइंग पथकाची गाड्या उचलण्याची कारवाई थांबवली

अकोला शहरातील रहदारी अडथळा थांबविण्यासाठी पोलिस प्रशासनाच्या शहर वाहतूक नियंत्रण शाखेने टोइंग पथक नेमले आहे शहरातील विविध ठिकाणी हे पथक रस्त्यावरील मोटार वाहन उचलून नेत त्यांना दंड देते मात्र टोइंग पथकाच्या वाहनावर नियमाने भोंगा द्वारे रस्त्यावरील असलेल्या वाहन धारकांना सूचना दयाव्या लागतात मात्र आज दिनांक 8 एप्रिल रोजी दुपारी 5 च्या सुमारास महाकाली चौकात पोलीस टोइंग पथक रस्त्यावरील गाड्या उचलत असतांना मनसेचे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांनी टोइंग पथकाला थांबवित आपण भोंग्याद्वारे पूर्व कल्पना का दिली नाही म्हणत प्रश्न केला व उचललेल्या गाड्या खाली उतरवल्या, टोइंग पथक बिना सूचना देत गाड्या उचलत असल्याचा निषेध करीत समंदित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.

गावात बालविवाह होणार नाही याची दक्षता घ्यावी, सरपंच, पोलीस पाटील व ग्रामसेवकांना जिल्हाधिका-यांची सूचना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *