राम उत्सव समिती साकारणार यंदा श्रीराम दरबार देखावा,तसेच लाखो रामलाल तैलचित्र चे करणार वितरण

Spread the love

राम उत्सव समिती साकारणार यंदा श्रीराम दरबार देखावा,तसेच लाखो रामलाल तैलचित्र चे करणार वितरण

राम उत्सव समिती साकारणार यंदा श्रीराम दरबार देखावा,आर्य समाज भवन येथे आयोजकांनी दिली पत्रपरिषदेत माहिती

अकोला : स्थानीय गांधी चौक परिसरात 15 वर्षापासून रामनवमीचे देखावे व सांस्कृतिक उपक्रम साकार करणाऱ्या राम उत्सव समितीच्या वतीने आगामी रामनवमीत रामभक्तांसाठी गांधी चौकात भव्य राम दरबार देखावा साकार करण्यात येणार असून एक लाख अकरा हजार नागरिकांना अयोध्येतील रामललाचे तैलचित्र वितरित करून विविध उपक्रमच्या माध्यमातून ही नवमी साजरी करण्यात येणार असल्याची माहिती राम उत्सव समितीच्या वतीने स्थानीय आर्य समाज भवनात 7 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.

यावेळी समितीचे मार्गदर्शक नितीन खंडेलवाल, पवन पाडीया, समितीचे अध्यक्ष विक्रांत देशमुख, कार्याध्यक्ष एड पप्पू मोरवाल, महामंत्री भरत मिश्रा, महिला सहसंयोजिका दीपिका ठाकूर, संयोजक अमरीश शुक्ला आदींच्या उपस्थितीत या उत्सवाची माहिती देण्यात आली. आगामी दिनांक दि 17 एप्रिल रोजी येत असलेल्या श्रीराम नवमीत अनेक उपक्रम साकारण्यात येणार आहेत. यात गांधी चौक येथील चौपाटी परिसरात राम दरबार सजविण्यात येणार असून यावर्षी राम दरबाराचा विहंगम देखावा साकार करण्यात येणार आहे.

गुडीपाडवा उत्सवापासून या भक्तिपूर्ण उपक्रमास मोठ्या भक्तीभावात प्रारंभ होणार आहे. दरम्यान
राम उत्सव समितीच्या गांधी चौक येथील कार्यालयाचे मान्यवरांच्या हस्ते थाटात उद्घाटन करण्यात आले असून रविवारी सकाळी उद्योजक नितीन खंडेलवाल तथा सेवाभावी बनवारीलाल बजाज यांच्या हस्ते राम दरवार उत्सव स्थळाचे भक्तिभावाने भूमिपूजन करण्यात येऊन मंडप उभारणीस प्रारंभ करण्यात येत आहे.

महिलांच्या सौभाग्याचा सण म्हणून दि 11 एप्रिल रोजी गणगौर उत्सव येत असून या दिनी दुपारी 5 वाजता गणगौर घाट येथे गणगौर पूजन होणार आहे. तसेच मातृ‌शक्तीसाठी उत्सव समितीच्या महिला शाखेच्या वतीने या ठिकाणी मातृशक्तीसाठी पूजन स्वागत सोहळा होणार आहे. दि 17 एप्रिल रोजी राम नवमी पर्यंत गांधी चौक येथील उत्सव स्थळी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. रामनवमीच्या दिनी दुपारी 12 वाजता राम जन्मोत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा करण्यात येणार आहे. यावेळी वालकांसाठी श्रीराम झाकीची स्पर्धा घेण्यात येणार असून यात उत्कृष्ट वेशभूषा धारण करणाऱ्या बालकांना आकर्षक पुरस्कार बहाल करण्यात येणार आहेत. सायंकाळी 7 वाजता गांधी चौक येथे भव्य महाआरती होणार आहे. यात हजारो महिला पुरुष राम भक्तांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. उत्सवाच्या सफलतेसाठी मार्गदर्शक मंडळाचे वरिष्ठ सेवाभावी पवन पाडीया, हरीश आलीमचंदानी, एड. मोतीसिंह मोहता, रामप्रकाश मिश्रा, दिलीप खत्री, विजय तिवारी, हरीश पारवानी, ओमप्रकाश गोयनका, कमल अग्रवाल, बनवारी बजाज, राधेश्याम शर्मा आदींच्या मार्गदर्शनात समितीचे संयोजक अंबरीश शुक्ला सहसंयोजक उमेश लखन, शशांक जोशी, राजेश शर्मा, निधि प्रमुख पंकज कागलीवाल, साहित्य वितरण दीपक रूहाटीया, पूजन समिति पं श्रीकांत इंदौरिया, पं सुरेश शिवाल, पं लाला तिवारी, राम दरबार प्रमुख धीरज झापर्डे, प्रचार प्रसार ऋषिकेश जकाते, भूषण इंदौरिया, बलवीर पारोचे, पिंटू उर्फ अरविंद मिश्रा, हभप तुलसीदास मसने महाराज, विजय शाह, संजय सिसोदिया, महेश वगरेट, संतोष अग्रवाल, दीपक अग्रवाल, अजय गावंडे, राजू शर्मा बालाजी, शैलेश तिवारी, गोविंद शर्मा, हरिप्रसाद मिश्रा, मनोज शर्मा, प्रियंका खितोसिया, महेंद्र पंडित, मनीष सुरेका, रवि मिश्रा, सुनील करणानी, जयेश जोगी, जितेंद्रकुमार घीया, आकाश सावते, कृष्णा मिश्रा, अंकुर सुरेका, वंसी मंडत, धीरज ठाकुर, प्रवीण अग्रवाल, शंकर शर्मा, राजू सोनटक्के, विजय पसारी, अंकित अग्रवाल, गुड्डू भाऊ, जगदीश मारमपल्ली, योगेश गवई, उमेश ताले, तुपार काकड़, मिहिर खिलोसिया, मितांश मिश्रा, पिंटू शर्मा, राम मेहंदीवाला, गणगौर उत्सव टीम राजश्री शर्मा, सुनीताताई तिवारी, भाविका मिश्रा, कल्पना गावंडे, तरुणा खिलोसिया, निशा कागलीवाल, संगीता शर्मा, कीर्ति नवलकार, रेशमा सेठ, कीर्ति मिश्रा, रितु शर्मा, रुचिका इंदौरिया, उषा मिश्रा, वंदना पारोचे, नयना जोगी, किरण दुबे, निशा व निशा कड़ी, रेखा मिश्रा, पूनम पांडे, कविता अग्रवाल, एड मेहल सावल समवेत राम उत्सव समितीचे पदाधिकारी व सेवाधारी कामकाज वघणार असल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *