जुना जनता कापड बाजार समोरील चौकात मोठा ट्रॅफिक जाम

Spread the love

जुना जनता कापड बाजार समोरील चौकात मोठा ट्रॅफिक जाम ! नियोजनाचा गोंधळ; नागरिक संतप्त

जुना जनता कापड बाजार समोरील चौकात ट्रॅफिक ही रोजचीच समस्या झाली असली तरीही ट्राफिक पोलिसांची या ठिकाणी ड्युटी नाही,आज 10 एप्रिल रोजी 2 वाजून 45 मिनिटांनी या ठिकाणी एवढी मोठी ट्राफिक जॅम झाली होती की अनेक नागरिक तासभर या कोंडीत अडकलेले पाहायला मिळाले. ट्रॅफिक पोलिसांची कमतरता, रस्त्यांवर होत असलेले अतिक्रमण,अवैध ऑटो कुठेही उभा करणे ट्राफिक पोलिसांचा नियोजनाचा अभाव यामुळे मोठ्या प्रमाणात कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला.त्यामुळे नागरिक संतप्त झाले होते, याबाबत शहर वाहतूक पोलीस निरीक्षक किंनगे यांनां याची माहिती दिली असता त्यांनी एक पोलीस शिपाई व एक मदतगाराला पाठविले मात्र कोंडी एवढी झाली होती की त्यांना ट्राफिक कोंडी सोडायला 1 तास अवधी लागला.

अग्निशमन विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र व ईतर अग्निशामक उपाययोजना करणे गरजेचे.

 

BreakingNews : प्रतीक पाटील यांनी अकोल्यात ऍड प्रकाश आंबेडकरांची घेतली भेट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *