बौध्द धम्मीय संघाठण वाढवीण्यासाठी सार्वजनिक भीम जयंतीचे आयोजन

Spread the love

बौध्द धम्मीय संघाठण वाढवीण्यासाठी सार्वजनिक भीम जयंतीचे आयोजन

डॉ.राजरत्न आंबेडकर प्रणित भारतीय बौद्ध महासभाअकोला जिल्ह्याचा उपक्रम

अकोला : भारतीय बौद्ध महासभा  अर्थात दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेली एक भारतातील राष्ट्रीय स्तरावरील बौद्ध संघटना आहे. याचे मुख्यालय मुंबई मध्ये असून सध्या या संघटनेचे चौथे व सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून  डॉ.राजरत्न आंबेडकर कार्यरत आहेत.त्यांच्या नेतृत्वाखालील बौध्द महासभा हीं बौध्द धम्मीय संघाठण वाढवीण्यासाठी कार्य करत आहे त्यांचसाठी भव्य स्वरूपात गेल्या सन २०२३ पासून अकोल्यात सार्वजनिक भीमजयंतीचे आयोजन केले जात आहे. यावर्षीही भव्य प्रमाणात भीम जयंती साजरी केली जाणार असून ग्रामीण भागातील आणि शहरातील सर्वच वॉर्डानमधून भीम अनुयायांनी सहभागी व्हावे असे आवाहन डॉ.राजरत्न आंबेडकर  प्रणित भारतीय बौध्द महासभा अकोला जिल्हाध्यक्ष डॉ.अरुण चक्रणरायण, कार्याध्यक्ष देवीलाल तायडे. व जिल्हा कार्यकारिणीने आज पत्रकार परिषदेत केले आहे.

डॉ.राजरत्न आंबेडकर  प्रणित भारतीय बौध्द महासभेच्या वतीने बौध्द धम्मीयांची स्वतंत्र बँक निर्मित होत आहे. त्याच पद्धतीने बौध्द धम्मीयांचे स्वतंत्र अस्तित्व दिसावे यासाठी सार्वजनिक भीमजयंतीचे आयोजन केले जात आहे. मागील वर्षी ग्रामीण भागातून लेझीम, आखाडे, व बँड तसेच भीम बुद्ध गीत गायन करणाऱ्या कलाकारांनी भीम जयंतीची शोभा वाढवली होती. त्याच पद्धतीने यावर्षीही भीम अनुयायांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. यावर्षीही भीम जयंतीची मिरवाणूक १४ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता रेल्वे स्टेशनं रोडवरील अग्रसेन चौकातून प्रारंभ होणार आहे. हीं मिरवणूक संतोषी माता चौकातून अकोट स्टॅन्ड मार्गे तिलक रोडवरून सिटी कोतवाली चौकात आणि तिथून गांधी रोडमार्गे नवीन बस स्टॅन्ड आणि अशोक वाटीका अशी असणार असून अशोक वाटीका येथे या मिरवाणुकीचा समारोप होणार आहे. भीम जयंती निमित्ताने बौध्द अनुयायांना बौद्धिक ज्ञानात भर घालणारे सर्व साहित्य उपलब्ध असणार आहे त्यामुळे मोठ्या संख्येने सहभागी व्हा असे आवाहन भारतीय बौध्द महासभा अकोला जिल्हाध्यक्ष डॉ अरुण चक्रनारायण, जिल्हा कार्याध्यक्ष देवीलाल तायडे, सुनील सिरसाट, इरभान तायडे, ऍड. चंद्रशील दंदी,यशवंत इंगोले, बाळासाहेब अंभोरे, सुनील तायडे, एम एम तायडे, राजू मोरे, दयाराम तायडे, राजकन्या सावळे, शोभाताई वानखडे, उत्तमराव सदाशिव सह लॉर्ड बुद्धा फॉउंडेशन वंदना संघ , डॉ बाबासाहेब आंबेडकर बुद्ध विहार चारिटेबल ट्रस्ट आदींनी केले आहे.

डॉ.राजरत्न आंबेडकर  प्रणित भारतीय बौध्द महासभा अकोला द्वारा आयोजित भीमजयंती अधिक भव्य स्वरूपात साजरी व्हावी या उद्देशाने आयोजनात काय बदल करावे लागतील यामध्ये आणखी कश्याचा समावेश करता येईल यासाठी सूचना आणि विचार मिळवाण्यासाठी उद्याच्या रविवारी बौध्द समाजातील सर्व सामाजिक संघटण, संस्था, व भीम अनुयायांना आमंत्रित करण्यात आले असून उद्देश सफल करण्यासाठी उपस्थित राहावे असेही आवाहन आज पत्रकार परिषदेत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *