यावळखेड येथे अपघात एकाचा मृत्यू…

यावळखेड येथे अपघात एकाचा मृत्यू…

अकोला : यावलखेड येथे रात्री दहाच्या सुमारास मोटारसायकल चा अपघात झाला असून मोटारसायकल चालक योगेश गुलाबराव मंडासे व बाळू घोगरे राहणार चौथा हे दोघे संगळुद येथून अकोल्याकडे येत असताना यावलखेड जवळ त्यांचा अपघातात झाला आहे.या अपघातात योगेश मंडासे याचा मृत्यू झाला तर बाळकृष्ण घोगरे हा गंभीर जखमी असल्याने त्यांना लगेच उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

यावळखेड येथे अपघात एकाचा मृत्यू...
या घटनेची माहिती आज सकाळी सहा वाजता येथील शेतकऱ्यांना मिळाली होती त्यांनी या घटनेची माहिती बोरगावमंजू पोलीस स्टेशन ला दिली असता बोरगावमंजू पोलीस घटनास्थळी दाखल झालेत.यावेळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला सर्वोच्च रुग्णालययेथे पाठविला असून अधिक तपास बोरगावमंजू पोलीस करीत आहेत.

Leave a Comment