सेवा पंधरवाडा अंतर्गत शाळांमध्‍ये डोमेस्‍टीक फायर प्रतिबंधात्‍मक आणि रस्‍ते सुरक्षताबाबत कार्यशाळा.

सेवा पंधरवाडा अंतर्गत शाळांमध्‍ये डोमेस्‍टीक फायर प्रतिबंधात्‍मक आणि रस्‍ते सुरक्षताबाबत कार्यशाळा.

अकोला दि. 21 सप्‍टेंबर 2022 – मनपा आयुक्‍त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांच्‍या आदेशान्‍वये अकोला महानगरपालिका प्रशासन दि. 17 सप्‍टेंबर ते 2 ऑक्‍टोंबर 2022 या कालाधीत ‘‘राष्‍ट्रनेता ते राष्‍ट्रपिता सेवा पंधरवाडा’’ साजरा करण्‍यात येत आहे. त्‍यानुसार अकोला महानगरपालिकेच्‍या अग्निशमन विभागाव्‍दारे आज दि. 21 सप्‍टेंबर रोजी रेलवे स्‍टेशन जवळील मनपा उुर्द शाळा क्रं. 2, 3 डाबकी रोड येथील उर्दू शाळा क्रं. 4, 10 आणि शिवनगर येथील मनपा शाळा क्रं. 17 येथे विद्यार्थ्‍यांनी रस्‍त्‍यावर चालत असतांना कोण-कोणते नियमांचा पाळावे आणि घरगुती सिलेंडर, टीव्‍ही किंवा ईतर उपकरणात लागलेल्‍या  आगीवर घरगुती उप‍करणाव्‍दारे नियंत्रण कसे करावे याबाबत मार्गदर्शन आणि प्रात्‍यक्षिक करून दाखविण्‍यात आले.

            सदर कार्यशाळा मनपा आयुक्‍त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांच्‍या आदेशान्‍वये तसेच मुख्‍य अग्निशमन अधिकारी हारूण मणियार यांच्‍या मार्गदर्शनात संपन्‍न झाली आहे. या कार्यशाळेमध्‍ये प्रात्‍यक्षिक करून दाखवणारे प्र.अग्निशमन निरीक्षक मनीष कथले, शुभम बोराळे, अभिजीत मनवर, महेश पांडे, शुभम वाघ, हनुमान घाटोळे  यांचा समावेश होता.

Leave a Comment