अमृतमहोत्सवी वर्षान‍िम‍ित्त पशुसंवर्धन व‍िभागातर्फे कार्यशाळा

अमृतमहोत्सवी वर्षान‍िम‍ित्त पशुसंवर्धन व‍िभागातर्फे कार्यशाळा

अकोला, दि.१५ : – पशुसंवर्धन विभागाच्यावतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सोहळा आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. अमृत महोत्सव अंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पशुसंवर्धन विभाग यांच्या सहकार्याने ॲनिमल राहत यांच्यावतीने पशुसंवर्धन व‍िभागातील पशुवैद्यकांना ‘मानवीय पद्धतीने वळूंचे वेदनारहित खच्चिकरण’ या व‍िषयावरील प्रशिक्षण व प्रात्यक्षिक स्ना.प.व.वि. संस्था व दुग्धशास्त्र विभाग पी.डी.के.व्ही. अकोला यांचे संयुक्त व‍िद्यमाने रविवारी (द‍ि. १४) देण्यात आले.

अध्यक्षस्थानी जिल्हाध‍िकारी न‍िमा अरोरा तर प्रमुख अतिथी मुख्य कार्यकारी अध‍िकारी सौरभ कटीयार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. धनंजय दिघे, डॉ. एस.डी. चव्हाण उपस्थित होते.

प्रास्ताविक जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. जगदीश बुतकरे यांनी केले. प्रशिक्षण समन्वयक सहायक आयुक्त डॉ. तुषार बावणे यांनी सुत्रसंचालन केले. प्रारंभी स्वातंत्र्य सैनिक व देशाच्या सैनिकांप्रती सद्भावना व्यक्त करण्यात आल्या. जिल्हाधिकारी न‍िमा अरोरा म्हणाल्या की, आपण प्राण्यांच्या वेदनाबाबत संवेदनशील असावे. मुक्या प्राण्यांच्या आरोग्य रक्षणार्थ अव‍िरत कार्य करणाऱ्या पशुवैद्यकांचे कार्य मोलाचे आहे.

ॲनिमल राहत संस्थेचे डॉ. चेतन यादव उपयोजन, शास्त्रोक्त वेदनारहीत खच्चिकरण पध्दतीचे प्रात्यक्षिक करून दाखविले. आभार प्रदर्शन जिल्हा पशुसंवर्धन अध‍िकारी डॉ. आर. बी. सोनोने यांनी केले. सांगता देशभक्तीपर गितांचे सादरीकरण करून करण्यात आले.

मनपा जाहिरात

Leave a Comment