खरंच काळे धागे बांधून काही फायदा होतो का?

खरंच काळे धागे बांधून काही फायदा होतो का?

 

खरंच काळे धागे बांधून काही फायदा होतो का?

हल्ली आपण आपल्या आजूबाजूला लहान बालकापासून तर मोठ्या माणसापर्यंत, हातामध्ये गळ्यामध्ये काळे धागे बांधलेले बघतो, हे काळे धागे कशासाठी बांधले जातात? फक्त चांगले दिसण्यासाठी की आपल्या बाळाला कुणाची नजर लागू नये म्हणून, आणखीनही बरीच कारणे लोक याची सांगतात, वास्तविक याच्या मागचे कारण बऱ्याच लोकांना माहित पण नसते.

अशाच प्रकारचा आणखी एक धागा आपल्या कमरेवर सुद्धा बांधला जातो, याला ‘करदोळा ‘पण म्हणतात.काही लोक ताबिज,छोटा विळा,चाकू बांधतात.

काळे धागे बांधल्याने आपल्या शरीराला काय नुकसान होऊ शकते?

गेल्या दहा वर्षापासून अकोट मध्ये गुरुवंदन हॉस्पिटलच्या माध्यमातून लहान मुलांचा डॉक्टर म्हणून मी सेवा देत आहे.अनेक वेळा माझ्यासमोर आई वडील त्यांच्या बाळाच्या समस्या घेऊन येतात. मानेभोवती काळे धागे बांधल्यामुळे त्या ठिकाणी जखमा होतात. ह्या जखमा का होतात त्याचे महत्त्वाचे कारण आहे त्यावर जमलेली धूळ. आपण सगळे लोक दररोज आंघोळ करतो, दररोज कपडे धुतो, आणि धुतलेले कपडे आपल्या बाळाला पण घालतो. परंतु मानेला गुंडाळलेल्या धाग्याला खूप साऱ्या प्रमाणात माती चिकटलेली असते, त्यामध्ये पावडर पण जमा झालेली असते, कधीकधी बॉडी लोशन पण त्या धाग्यांवर जाऊन बसते, आता एवढं सगळं त्या धाग्यावर चिटकल्यावर तो धागा काही इन्फेक्शन केल्याशिवाय राहणार आहे का? आणि त्यानंतर बाळाला मानेवरती लाल पुरळ यायला सुरुवात होते. म्हणून असे काळे धागे बांधून त्वचेचे आजार उत्पन्न होतात.

निसर्गाने जेव्हा आपल्याला जन्म दिलेला आहे तेव्हा आपल्या अंगावर कुठल्याच प्रकारचा धागा नसतो, आणि आपण चांगल्या प्रकारे रडून रडून जगण्याची नवी उमिद दाखवतो. त्यामुळे जन्म झाल्यानंतर बाळाला आईच्या दुधाची जास्त गरज आहे, स्वच्छ वातावरणाची जास्त गरज आहे काळा धाग्यांची नाही.

डॉक्टर धर्मपाल चिंचोळकर
गुरुवंदन हॉस्पिटल जिजामाता चौक , अकोट
7588962518

हे सुद्धा वाचा – वन्य प्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त लावा अकोट येथील शेतकऱ्यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन

 

 

Leave a Comment