वन्यप्राण्याच्या हल्ल्यात तरुण जखमी ! बिबट्या असल्याची गावक-यांना शंका

वन्यप्राण्याच्या हल्ल्यात तरुण जखमी !
बिबट्या असल्याची गावक-यांना शंका
अकोला सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू

वन्यप्राण्याच्या हल्ल्यात तरुण जखमी ! बिबट्या असल्याची गावक-यांना शंका

अकोला : आगार येथील शुभम सिरसाट (25) हा शेतात मोल मजूरी करण्याकरिता गेलेला असताना अचानक वन्यप्राण्याने त्याच्यावर हल्ला केला. ही घटना आगार फाट्या जवळ दि.15 सप्टेंबरला दुपारी दीडच्या सुमारास घडली. एकाऐकी झालेल्या या हल्ल्याने शुभम घाबरला अशातच प्रतिकार करत, त्याने आरडाओरडा केली. त्यावेळी जवळपास गुरे ढोरे चारत असलेले नागरिक तेथे धावत आल्याने त्या वन्यप्राण्याने धूम ठोकली होती. मात्र हल्ल्यात शुभमच्या डोक्याला मोठी जखम झाली असून, पाठीवरही जखम झाली आहे. शुभमला सरपंच व येथिल नागरिकांनी तात्काळ अकोला सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले.

वन्यप्राण्याच्या हल्ल्यात तरुण जखमी ! बिबट्या असल्याची गावक-यांना शंका

सध्या शुभमवर उपचार सुरू आहेत.

उपचारासाठी समाजसेवक नितीन सपकाळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याची माहिती सरपंच अतिश शिरसाट यांनी सांगितले, असून जखमी असलेल्या शुभम ची ट्रिटमेंट सी एम ओ डॉक्टर सरोदे , सर्जरी तज्ञ डॉक्टर रामसर . डॉक्टर राणी चिंचोलकार . डॉक्टर स्नेहा यांनी तात्काळ जखमेवर उपचार सुरू केले

यावेळी सरपंच व येथील गावक-यांनी वन विभागाकडून शुभमला आर्थिक मदत मिळावी व वन्यप्राण्यांपासून गावक-यांचे संरक्षण मिळावे अशी मागणी केली आहे. दरम्यान, घटनेची माहीती मिळताच वनविभागाचे चमू घटनास्थळी पोहचले आहेत. तरुणवर हल्ला केलेला बिबट होता कि आणखी दुसरा प्राणी याचा शोध सध्या वनविभाग घेत आहे. घडलेल्या घटनेमुळे आगर व जवळपासच्या गावांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. आठ दिवसांआधी बिबट्या असल्याची शंका गावक-यांना होती, ती आज खरी ठरल्याची चार्चा गावक-यांमध्ये आहे.

वनविभाग अधिकारी 

सध्या आमची टिम घटनास्थळी पोहोचली आहे. लोक सांगतायेत परंतु कुठला प्राणि आहे हे सध्या निश्चीत सांगता येत नाही.

ही बातमी व्हिडिओ पहा 👇

 

Leave a Comment