अमृत महोत्‍सव अंतर्गत अकोला महानगरपालिका येथे रक्‍तदान शिबिरात मनपा कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान

14 ऑगस्‍ट रोजी स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव अंतर्गत अकोला महानगरपालिका येथे रक्‍तदान शिबिरात मनपा कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान

अमृत महोत्‍सव अंतर्गत अकोला महानगरपालिका येथे रक्‍तदान शिबिरात मनपा कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान

मनपा रक्तदान

अकोला दि. 14 ऑगस्‍ट 2022 – स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव अंतर्गत आज दि. 14 ऑगस्‍ट रोजी अकोला महानगरपालिकेच्‍या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुख्‍य सभागृह येथे रक्‍तदान शिबीराचे आयोजन करण्‍यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन मनपा उपायुक्‍त पुनम कळंबे यांच्‍या हस्‍ते संपन्‍न झाले असून यामध्‍ये अकोला महानगरपालिकेतील विविध विभागातील कर्मचा-यांनी रक्‍तदान केले आहे, रक्‍तदान केलेल्‍या सर्व कर्मचा-यांना अकोला ब्‍लड बँक तथा डायग्‍नोसीस सेंटरच्‍या वतीने प्रशस्‍ती पत्र देण्‍यात आले आहे. तसेच डोनर कडून घेण्‍यात आलेला रक्‍त हा गरजू नागरिकांना देण्‍यासाठी अकोला ब्‍लड बँक तथा डायग्‍नोसीस सेंटर येथे जमा करण्‍यात आले आहे.

मनपा जाहिरात

तसेच यावेळी अकोला ब्‍लड बँक चे संचालक डॉ.के.के.अग्रवाल यांच्‍याव्‍दारे अकोला महानगरपालिकेला मानचिन्‍ह व प्रशस्‍तीपत्र देऊन गौरव करण्‍यात आला आहे.

या कॅम्‍प मध्‍ये अकोला ब्‍लड बँक तथा डायग्‍नोसीस सेंटरच्‍या तज्ञ डॉक्‍टरांकडून रक्‍त घेण्‍याची कार्यवाही करण्‍यात आली असून यामध्‍ये ब्‍लड बँकचे डॉ.वि.बी.ईटके, एस.एस.स्‍वामी, ब्रम्‍हा वाठोरे, राजू जामकर, अरूण सुगाडे यांचा समावेश असून नियोजनामध्‍ये मनपा वैद्यकीय आरोग्‍य विभागाचे मनपा वैद्यकीय आरोग्‍य अधिकारी डॉ.अस्मिता पाठक, डॉ.मुसलोद्दीन, डॉ.नितिन गायकवाड, डॉ.वासिक अली, डॉ.मनिषा बोरीकर आदिंचा समावेश होता.

 व्हिडिओ बातमी पहा 👇

 

AKOLA TIMES

Leave a Comment