उद्योगांना नवचालना देण्यासाठीच काँगेसचा औद्योगिक सेल-डॉ सोनोरे

उद्योगांना नवचालना देण्यासाठीच काँगेसचा औद्योगिक सेल-डॉ सोनोरे

अकोला – विदर्भात उद्योगधंद्यांची पीछेहाट झाली आहे.अनेक प्रकल्प बंद झाले आहेत.मोठे प्रकल्प येईनासे झाले आहेत.त्यामुळे रोजगाराचा भीषण प्रश्न निर्माण झाला आहे.अश्या जर्जर झालेल्या वा बंद पडलेल्या उद्योगांचे पुनर्वसन करण्यासाठी नव्याने प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेश काँग्रेसच्या औद्योगिक सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ हेमंत सोनारे यांनी दिली.

स्थानीय शासकीय विश्रामगृहात रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत डॉ सोनारे यांनी काँग्रेसच्या औद्योगिक सेलच्या उपक्रमांची माहिती दिली.कोरोना महामारी नंतर उद्योगांची खऱ्या अर्थाने पिछेहाट झाली आहे.वास्तविक ही पिछेहाट केंद्राच्या बेताल धोरणामुळेच झाली आहे.केंद्राचे औद्योगिक धोरण हे मूठभर भांडवलदारांच्या खास मर्जीसाठीच निर्माण केले आहे.

विदर्भातील उदयोगधंदे व कारखानदारी ही संपविण्याचे धोरण आखले जात आहे.विदर्भातील उद्योगधंद्यांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी काँग्रेसचा औद्योगिक सेल नवं आंदोलन उभं करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.ते म्हणाले,उद्योग विश्वाला राजकारण पासून दूर ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.राजकारण हे निवडणूक पुरत ठेवून अन्य वेळ हा औद्योगिक,व्यापारीक विकासा साठी पाहिजे तरच औद्योगिक क्रांती पुन्हा होऊ शकते.

यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्या अडीअडचणी व समस्यांना प्रथम समजने आवश्यक असून यासाठीच जिल्हावार औद्योगिक सेलचे संघटन गठीत करण्यावर आपला जोर राहणार असल्याचे त्यांनी सांगून व्यापारी, उद्योजक, कारखानदार, छोटे मोठे विक्रेते आदी वर्गाने आपल्या न्याय हक्कासाठी काँगेसच्या औद्योगिक सेल मध्ये सहभावी होऊन संघटन सशक्त करण्याचे आवाहन केले.या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर,महानगराध्यक्ष डॉ प्रशांत वानखडे,सेलचे महानगराध्यक्ष विवेक पारस्कर,सेलचे जिल्हाध्यक्ष सोमेश डीगे,अभिलाष तायडे,प्रशांत भटकर,तपसु मानकीकर,गोपाल पाटील उगले,आकाश कवडे,गणेश कलस्कर, महेंद्र गवई,प्रशांत प्रधान,अन्सार खान,सै मतीन,अक्षय गढेकर, अश्विन खडसे,संदेश वानखडे आदी उपस्थित होते.

Leave a Comment