2 वर्षांनंतर शेवटच्या सोमवारी गुंजणार हर बोला महादेवाचा गजर

2 वर्षांनंतर

2 वर्षांनंतर शेवटच्या सोमवारी गुंजणार हर बोला महादेवाचा गजर

अकोला : श्री राज राजेश्वर शिवभक्त मंडळ शिवाजी नगर जुने शहर अकोला च्या वतीने आज श्री राज राजराजेश्वर मंदिरात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेत शेवटच्या श्रावण सोमवारी निघणा – या पालखी व कावड उत्सव बाबत माहिती दिली.

गेली दोन वर्ष कोरोनामुळे सार्वजनिक, पालखी सोहळा संपन्न झालेला नाही मात्र आता यावर्षी शासनाने सर्व नियम शिथिल करुन सार्वजनिक उत्सवाला परवानगी दिल आहे. त्यानिमित्त श्री राजराजेश्वर शिवभक्त मंडळ मोठया उत्स्फूर्तपणे पालखी सोहळा राबविल्या जाणार असल्याची माहिती राजेश्वर शिवभक्त मंडळाच्या वतीने आज पत्रकार परिषदेत दिली.

हे सुद्धा वाचा – अकोल्यातील 700 वर्ष पुरातन राजराजेश्वर मंदीरात भक्तांची तिसऱ्या सोमवारी दर्शनासाठी गर्दी 

त्यामुळे यावर्षी भाविकांचा मोठा उत्साह पाहवयास मिळणार आहे. यावर्षी श्रावणातील शेवटचा सोमवार, ता. २२ ऑगस्ट रोजी हा सोहळा होणार आहे. त्याचे नियोजन करण्यासाठी सर्व पालखी व कावड मंडळांच्या अध्यक्ष व सचिवांची बैठक बुधवारी आयोजित करण्यात आली असून यावेळी पालखी नंबर सुद्धा देण्यात येणार असून या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन राजेश्वर शिवभक्त मंडळातर्फे करण्यात आले.

अशी माहिती आयोजन समितीतर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे.

या पत्रकाल परिषदेला मंडळाचे अध्यक्ष चंदू सावजी, कार्याध्यक्ष सुनील गरड, उपाध्यक्ष चंद्रशेखर उकर्डे, सचिव राजीव बुंदेले व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.


https://www.traveliqs.in/hi/weekend/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%20%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%20%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0%20%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE%20%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%20%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0%20%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE/10908

 

Leave a Comment