आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या १३ कुटुंबीयांना मिळणार मदत

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या १३ कुटुंबीयांना मिळणार मदत

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या १३ कुटुंबीयांना मिळणार मदत ;अकोल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांची माहिती

नापिकी व कर्जबाजारीपणासह इतर कारणांमुळे जीवन संपवलेल्या शेतकऱ्यांची १३ आत्महत्येची प्रकरणे शासकीय मदतीसाठी पात्र ठरली अाहेत. मात्र दोन प्रकरणे अपात्र झाली अाहेत. जिल्हा स्तरीय समितीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासकीय मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

निसर्गाच्या लहरीपणामुळे सततची नापिकी, घटते उत्पादन व वाढता उत्पादन खर्च, खासगी सावकार, वित्तीय संस्था, बँकेकडून घेतलेले कर्ज यासह इतर कारणांमुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. आत्महत्या करणाऱ्या या शेतकऱ्यांना शासनाकडून मदत देण्यात येते. संबंधित मदतीसाठी पात्र शेतकऱ्यांचे प्रकरण निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी आत्महत्याग्रस्त समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली होती.या बैठकीत एकूण १५ प्रकरणे ठेवण्यात आली. त्यापैकी १३ प्रकरण मदतीसाठी पात्र जाहीर करत दोन प्रकरणांना अपात्र निश्चित केले. अशी माहिती अकोला जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिलीय.

यांच्यासह समितीचे इतर सदस्य, त्यांचे प्रतिनिधी उपस्थित हाेते.

अशी आहेत पात्र प्रकरण 👇

राजाराम पोरे (वय ४०, रा. सांगोळा, पातूर), आशिष गिरी (३०, आगीखेड, पातूर),

दीपक बोरकर (२५, जांब, पातूर),

नारायण पिंपळकर (३६, सायखेडा, बार्शीटाकळी), संतोष इंगोले (५०, भेंडगाव, बार्शीटाकळी), हरिदास हजारे (३५, कासमार, बार्शीटाकळी),

नामदेव तायडे (४०, खेर्डा, बार्शीटाकळी), सिद्धार्थ जंजाळ (३७, मोरगाव भाकरे, अकोला), सुभाष तायडे (५८, कौलखेड जहां, अकोला), सुनील इंगळे (५५, चांगेफळ, अकोला), संजय चतरकर (५२, कापशी तलाव, अकोला), पुरुषोत्तम करवते (२०, सावरगाव, पातूर), तुळशीराम शिंदे (वय ५५, राजुरा घाटे, मूर्तिजापूर).

Leave a Comment