राज्यातील दिव्यांगांच्या घरोघरी जाऊन सर्वे करने आवश्यक आहे अकोला पॅटर्न महाराष्ट्रात राबवण्याचा प्रयत्न करणार ; आ.बच्चूभाऊ कडू

राज्यातील दिव्यांगांच्या घरोघरी जाऊन सर्वे करने आवश्यक आहे अकोला पॅटर्न महाराष्ट्रात राबवण्याचा प्रयत्न करणार ; आ.बच्चूभाऊ कडू

अकोला : गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील दिव्यांगांच्या हक्कासाठी प्रयत्न करत असतांना राज्यातील दिव्यांगांचा एकत्रीत डाटा उपलब्ध

अकोला पॅटर्न महाराष्ट्रात राबवण्याचा प्रयत्न

नसल्यामुळे जिल्हानिहाय दिव्यांगांच्या योजना व राज्यातील सर्व प्रवर्गातील दिव्यांगांच्या योजनांचा कृती आराखडा करणे शक्य होत नाही ,

हि बाब लक्षात घेऊन , अकोला जिल्ह्याचा पालक मंत्री असतांना , पथदर्शी प्रकल्प म्हणून दिव्यांगांच्या घरोघरी जाऊन सर्वे करण्यात आला

जिल्हा प्रशासन अकोला जिल्हापरिषद , समाज कल्याण विभाग , आरोग्य विभाग , इ.विविध विभागांना एकत्रीत करून आशा वरकर्सच्या माध्यमातून हा सर्वे पार पाडण्यात आला.

यासाठी या क्षेत्रातील तंज्ञ संस्था म्हणून महात्मा गांधी सेवा संघ जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र औरंगाबाद यांची मदत घेण्यात आली व या संस्थेमार्फत अंतीम रिपोर्ट तयार करून शासनास सादर करण्यात आला.

अकोला जिल्ह्यामध्ये सर्वेच्या अगोदर ७ हजार दिव्यांगांची नोंदणी होती . सर्वे प्रक्रियेनंतर ती ४५ हजारावर पोहचली अकोला जिल्ह्याच्या दिव्यांगांचा विविध योजनांचा कृती आराखडा आम्ही करू शकलो, हाच धागा पकडून महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यात दिव्यांगाच्या घरोघरी जाऊन सर्वे करणे हा आमचा मानस आहे .

असे प्रतीपादन दिव्यांग क्षेत्राला प्राधान्स देऊन काम करणारे आमदार बच्चू कडू यांनी केले , ते त्यांच्या मतदार संघाती अचलपूर चांदूरबार विधानसभा मतदार संघातील दिव्यांगांच्या सर्वेच्या उद्दघाटन प्रसंगी बोलत होते.

कुरळपूर्णा येथे सत्य शोधक बहुउद्देशीय शिक्षण संस्था व महात्मा गांधी सेवा संघ औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आशा वर्कर प्रशिक्षण शिबीरांच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते . या प्रशिक्षण शिबीरासाठी दोन्ही तालुक्यातील सर्व आशा दरकर्सच्या , सुपर वाईजर , बिडीओ , समाज कल्याण अधिकारी , तथा संस्थेचे पदधिकारी उपस्थिती होते .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.नैनाताई बच्चूभाऊ कडू यांनी केले तर सर्वेक्षणाच्या नियोजनाची माहिती महात्मा गांधी सेवा संघाचे संचीव विजय कान्हेकर यांनी दिली

महात्मा गांधी सेवा संघचे मुख्य कार्यकारी अधिकारी , अमेय अग्रवाल यांनी आशा ताईना प्रशिक्षण दिले या वेळी सी . आर . सी नागपूरचे प्रफुल शिंदे सत्यशोधक संस्थेचे चंदूभाऊ मोहळ , जिल्हा समाज कल्याण अधिकारी पाडूरंग पुंड , राहूल माला , व इ . पदधिकारी उपस्थित होते .

Leave a Comment