स्‍टार्टअप यात्रा बुधवार(दि.१७)पासून ! जिल्ह्यात; नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन

स्‍टार्टअप यात्रा बुधवार(दि.१७)पासून ! जिल्ह्यात; नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन

अकोला, दि.१५(जिमाका):- राज्‍यातील नागरिकांच्‍या नाविन्‍यता पुर्ण संकल्‍पना आणि नवउद्योगांना प्रोत्‍साहन देण्‍यासाठी कौशल्‍य, रोजगार , उद्योजकता व नाविन्‍यता विभागामार्फत महाराष्‍ट्र राज्‍य नाविन्यपूर्ण स्‍टार्टअप धोरण २०१८ अंतर्गत महाराष्‍ट्र स्‍टार्टअप आणि नाविन्‍यता यात्रा बुधावर दि.१७ पासून जिल्ह्यात येत आहे, अशी माहिती सहायक संचालक रोजगार स्वयंरोजगार द.ल. ठाकरे यांनी दिली आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी आणि होतकरु महिला पुरुषांनी या यात्रेचा लाभ घेऊन स्टार्टअप योजनांची माहिती करुन घ्यावी,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, ही यात्रा जिल्‍हयातील प्रत्‍येक तालुक्‍यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था येथे दिनांक १७ ते २० या कालावधीत स्‍टार्टअप यात्रेचा प्रचार व प्रसार करण्‍यांसाठी येतआहे.

या यात्रेत मोबाईल व्‍हॅन सोबत असलेल्‍या प्रतिनिधीव्‍दारे नागरिकांना या यात्रेची संपुर्ण मा‍हिती, नविन्‍यपुर्ण संकल्‍पना व त्‍याचे पैलू तसेच विभागामार्फत राबविल्‍या जाणाऱ्या विविध उपक्रमाबाबत माहिती देण्‍यात येईल. याचबरोबर नाविन्‍यपूर्ण कल्‍पना असलेल्‍या नागरिकांची नोंदणी करुन यात्रेच्‍या पुढील टप्‍प्‍याबाबत माहिती पुरविण्‍यात येईल.

हे सुद्धा वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे खातेवाटप

स्टार्टअप यात्रेचे वेळापत्रकः- दि.१७ रोजी स्‍टार्टअप यात्रा जनजागृती व्‍हॅन जिल्‍हाधिकारी कार्यायलयात दाखल होईल. तेथे जिल्हाधिकाऱ्यांना स्‍टार्टअप यात्रेच्‍या प्रयोजनाची माहिती देऊन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था अकोला, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठ अकोला तसेच शहरातील नामांकीत महाविद्यालयांना भेट देऊन नागरिकांना स्‍टार्टअप बाबत संपूर्ण माहीती देण्‍यात येईल.याच दिवशी बाळापुर व पातूर तालुक्‍यातील शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्‍था व शहरातील महाविद्यालये तसेच शास‍कीय कार्यालये यांना भेटी दिल्या जातील. दि.१८ रोजी मुर्तिजापुर व बार्शिटाकळी तालुक्‍यातील शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्‍था व शहरातील महाविद्यालये तसेच शास‍कीय कार्यालयांना भेट देईल. दि.२० रोजी स्‍टार्टअप यात्रा अकोट व तेल्‍हारा तालुक्‍यातील शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्‍था व शहरातील महाविद्यालये तसेच शास‍कीय कार्यालये यांना भेट देईल.

स्‍टार्टअप यात्रेचे वेळापत्रक व भेटीची ठिकाणे याबाबत अधिक माहितीसाठी संबधीत तालूक्‍याचे शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्‍थाचे प्राचार्य यांच्याकडे चौकशी करावी. जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अकोला या कार्यालयाच्‍या दूरध्‍वनी क्रमांक ०७२४- २४३३८४९ किंवा ९६६५७७५७७८ या भ्रमणध्‍वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन सहायक आयुक्‍त जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अकोला द.ल. ठाकरे यांनी केले आहे.

हे सुद्धा वाचा – आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांत शुन्य पॉझिटीव्ह, तर पाच डिस्चार्ज

मनपा जाहिरात

 

 

Leave a Comment