जिल्ह्यात १७ ते २० दरम्यान स्टार्टअप, नाविन्यता यात्रा

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचा उपक्रम

जिल्ह्यात १७ ते २० दरम्यान स्टार्टअप, नाविन्यता यात्रा

अकोला : नागरिकांच्‍या नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता  विभागामार्फत  ‘महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण  स्टार्टअप धोरण २०१८’ अंतर्गत महाराष्ट्र  स्टार्टअप आणि  नाविन्यता यात्रेचे आयोजन दि.१७ ते २० दरम्यान जिल्ह्यात करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त,द. ल. ठाकरे यांनी दिली आहे.

या यात्रेसाठी प्रत्येक तालुक्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे दि.१७ ते दि.२० या कालावधीत एक  मोबाईल व्हॅन पाठविण्यात  येणार आहे. मोबाईल व्हॅन सोबत असलेल्या  प्रतिनिधीव्दारे  नागरिकांना संपूर्ण माहिती, नावीन्यपूर्ण संकल्पना व त्याचे पैलू तसेच विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाबद्दल  माहिती देण्यात येईल. याचबरोबर नावीन्यपूर्ण  कल्पना असलेल्या नागरिकांची नोंदणी करुन यात्रेच्या पुढील टप्प्याबाबत माहितीही पुरविण्यात येईल.

नाविन्यता यात्रेचे वेळापत्रक

अ.क्र. दिनांक वार स्थळ
1 17/08/2022 बुधवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बाळापूर
2 17/08/2022 बुधवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अकोला
3 17/08/2022 बुधवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पातूर
4 18/08/2022 गुरुवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बार्शीटाकळी
5 18/08/2022 गुरुवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मूर्तीजापूर
6 20/08/2022 शनिवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आकोट
7 20/08/2022 शनिवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तेल्हारा

            इच्छुक उमेदवारांनी दि.१७ ते २० या कालवधीत प्रत्येक तालुक्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे  उपस्थित राहून माहिती घ्यावी असे, आवाहन जिल्हा कौशल्य  विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त द.ल. ठाकरे यांनी केले आहे.

Leave a Comment