श्री मारवाडी प्रेस गणेशोत्सव मंडळाची राहणार नयनरम्य झाकी

श्री मारवाडी प्रेस गणेशोत्सव मंडळाची राहणार नयनरम्य झाकी

अकोला : गत ८६ वर्षापासून जिल्ह्यात श्री भक्तांच्या आकर्षणाचे केंद्र ठरलेल्या श्री मारवाडी प्रेस गणेशोत्सव मंडळात याही वर्षी विविध देखावे-

राहणार असल्याची माहिती मारवाडी प्रेस गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

श्री मारवाडी प्रेस गणेशोत्सव मंडळाची राहणार नयनरम्य झाकी

याही वर्षी मंडळाच्या वतीने सिद्धिविनायकाची झकी साकार करण्यात आली असून यात रिद्धी सिद्धी सहित विठ्ठल दर्शन, पंढरपुर वारकरी देखावा, श्री संत नगरी,विराट शिवदर्शन, कृष्णाची कालिया मर्दन करत असलेली झाकी, हनुमान दर्शन, गोमाता दर्शन,

शिवाजी महाराज यांची झाकी आदी झाक्या भक्ताच्या आकर्षणाचे केंद्र ठरणार आहेत. सालाबाद प्रमाणे यावर्षीही मूर्तिकार सुरेश आंबेरे यांनी सिद्धिविनायकाची मूर्ती तयार केली असून मंडपाची सजावट बाबू बागडे यांची गाडगेबाबा सर्विस ही करत आहे.

AKOLA TIMES

उपक्रमांचा प्रारंभ बुधवार दिनांक 31 ऑगस्ट पासूनच होणार असून गणेश स्थापनानंतर अकरा पंडितांच्या उपस्थितीत विविध मंत्रोच्चार करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. प्रथम दिवसाचे यजमान म्हणून अरविंद अग्रवाल हे सपत्नीक गणरायाची पूजा करणार आहेत,

 

तर प्रतिदिन सतीश खोडवे यांची संगीतमय आरती रात्री नऊ वाजता भक्तांच्या आकर्षणाचे केंद्र राहणार आहे. मंडळाच्या वतीने दर दिवशी रात्री 8 वाजता आरती रात्री 9 वाजता मंडप सजावट

करणाऱ्या कलाकारांचा सत्कार करण्यात येणार असून याचे प्रकल्प प्रमुख म्हणून कुणाल चांडक, सुजल चांडक, तिवारी हे राहणार आहेत,त्याचप्रमाणे राजराजेश्वर ढोल पथक अकोलाच्या वतीने ढोल वादकांचा वादन कार्यक्रमही मंडळात करण्यात येणार आहे.

AKOLA TIMES

समाजोपयोगी उपक्रमाच्या माध्यमातून मंडळाच्या वतीने प्रतिदिन अन्नदान उपक्रम हाती घेण्यात आला आहे. नित्य सकाळी 11 वाजता जिल्हा स्त्री रुग्णालयात भोजन वितरित करण्यात येणार आहे.

हे भोजन तब्बल दहा दिवस चालणार असल्याची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

त्याचप्रमाणे जिल्हा स्त्री रुग्णालयातही प्रति सोमवार मंडळाच्या वतीने भोजनदानाचा कार्यक्रम होत असतो.

हा प्रकल्प अशोक भूतडा, लूनकरन मालानी यांनी साकार केला आहे. गुरुवार दिनांक 1 सप्टेंबर पासून तो 8 सप्टेंबर पर्यंत मंडळाच्या प्रांगणात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून या कार्यक्रमाचा लाभ श्री भक्तांनी मोठ्या संख्येने घ्यावा असे आवाहन या पत्रकार परिषदेत करण्यात आले.

या उत्सवाच्या सफलतेसाठी मंडळाचे अध्यक्ष पराग शहा, उपाध्यक्ष भूपेंद्र तिवारी,गोविंद लढ्ढा,सचिव दिवेश शहा, सहसचिव अनंत बोदडे,कोषाध्यक्ष प्रशांत चांडक, अंकेक्षक नितीन चांडक, कार्यकारणी सदस्य राम लड्डा, शैलेंद्र तिवारी, शैलेश शहा, उदय शहा, अतुल मांडणी,

कल्पेश शाह, प्रशांत शहा, सत्यम अग्रवाल, संजय मंत्री तथा सल्लागार समितीचे अनिल तापडिया, शरद चांडक,अशोक भूतडा, ब्रजेश तापडिया, पंकज तापडिया, सचिन चांडक, आशिष राठी,केशव खटोड, सुशांत राठी, मनोज लड्डा, अमित राठी तथा सदस्यगण

कमलकिशोर तापडिया, जगमोहनतापडिया, विश्वनाथ शर्मा, अश्विन जाजू,लूनकरण मालानी, नरेंद्र भाला, सुनील बंग, गोपाल लाहोटी, नंदकिशोर बाहेती, राधेश्याम चांडक, डॉ संतोष सोमानी, प्रमोद कचोलिया, विजय राठी, निशांत भन्साली,अमित भूतडा,अलोक भुतडा आदी प्रयत्न करीत आहेत.

Leave a Comment