शिवणी येथे शहिद प्रशांत राऊत स्मारकासाठी स्वाक्षरी अभियान

शिवणी येथे शहिद प्रशांत राऊत स्मारकासाठी स्वाक्षरी अभियान | अकोल्याचे उपजिल्हाधिकारी यांनी दिली भेट

शिवणी येथे शहिद प्रशांत राऊत स्मारकासाठी
अकोला – शहरातील शिवणी येथील सैनिक प्रशांत राऊत यांचे गत १५ वर्षाआधी देशाची सेवा करत असताना विर मरण झाले . तेंव्हापासून त्यांचे स्मारक बनावे यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले . परंतु , सर्वस्तरावरून शिवणीवासीयांच्या पदरी निराशच आली . शिवणी – कुंभारी , शिवणी – शिवापूर रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या चौकात एक फलक व शहिद राऊत यांची प्रतिमा लाऊन नागरिकांनी त्याच ठिकाणी स्मारक तयार करण्याचा प्रयत्न केला. परंतु , ती जागा खासगी असल्यामुळे त्या ठिकाणी वादही निर्माण झाला . राजकारणाला बळी पडलेले हे स्मारक व्हावे या उद्देशाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त स्मारक संयोजक समितीच्या वतीने भर पावसात प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वाक्षरी अभियान राबविले. नागरिकांनीही अभियानाला प्रतिसाद देत अभियान यशस्वी केले .यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी भेट देऊन शहिद प्रशांत राऊत यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. स्माकरासाठी लवकरात लवकर मार्ग काढू असल्याचे त्यांनी यावेळी समितीला आश्वासन दिले आहे.

हे सुद्धा वाचा – जगदीशभाई इंगळे यांचा जिल्हाधिकारी कार्यालय च्या गच्ची वर चढून आत्मदहनाचा प्रयत्न

अभियान यशस्वीतेसाठी प्रवीण वाहुरवाघ , जयेंद्र वानखडे , रामा वाघमारे , दादाराव खांडेकर , मनीष वानखडे , विकास नरवाडे , आशिष सोनवणे आकाश उमाळे , पप्पू वानखडे , आशिष वानखडे , संगिता खंडारे , यांच्यासह शिवणीतील तरुणांनी अथक परिश्रम घेतले .

ही बातमी व्हिडिओ पहा 👇


महानगरात छायाचित्रकारांची निघणार कॅमेरा दिंडी शहरात होणार जागतिक फोटोग्राफीचा प्रवास

Leave a Comment