वन्य प्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त लावा अकोट येथील शेतकऱ्यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन

वन्य प्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त लावा अकोट येथील शेतकऱ्यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन

वन्य प्राण्यांमुळे शेतांचे वारंवार होणाऱ्या नुकसानास कायमस्वरूपी प्रतिबंध लावण्याचे निवेदन अकोट येथील शेतकऱ्यांनी दिले अकोला जिल्हाधिकारी यांना

वन्य प्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त लावा अकोट येथील शेतकऱ्यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन
वन्य प्राणी हरिण नीलगाय रानडुक्कर माकड यांच्या त्रासामुळे येथील शेतकऱ्यांना शेती करणे कठीण झाले आहे शेतीच्या पेरणी पासून ते शेती शेतातील पीक घरी येईपर्यंत वन्य प्राण्यांमुळे पिकाचे सातत्याने नुकसान होत आहे या भागात दीडशे ते 200 हरियाणांचे कळप तयार झाले असून नीलगाई सुद्धा मोठ्या प्रमाणात कळपामध्ये निर्माण झाले आहेत

तर माकड व रानडुक्कर शेकडो च्या संख्येने वाढले आहेत यांच्यापासून शेतीतील पिकांचे संरक्षण करणे कठीण झाले आहे हे वन्य प्राणी दररोज काही शेतामध्ये पिकांचे नुकसान करत आहे दररोज याबाबतच्या तक्रारी करणे व नुकसानाचे पंचनामे करणे व्यवहारी दृष्ट्या शक्य नाही

त्यामुळे या भागातील वन्यप्राण्यांना पकडून वन्यक्षेत्रामध्ये नेऊन सोडण्यात यावे आणि वन्यप्राणी वन्यक्षेत्रातून शेत शिवारामध्ये येणार नाहीत याकरिता कायमस्वरूपी उपाय योजना करण्यात यावी असे निवेदन आज अकोट येथील शेतकऱ्यांनी अकोला जिल्हाधिकारी यांना दिले

तसेच 15 दिवसात व न्यप्राण्यांचा बंदोबस्त न लावल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.यावेळी गोपाल जगन्नाथ शेगोकार दीपक प्रकाश काळे गोवर्धन श्रीराम शेंडे कैलास नारायण चिखले सचिन काळे सह शेतकरी उपस्थित होते.

बातमी व्हिडिओ चॅनल ला पहा 👇

हे ही वाचा – वन्यप्राण्याच्या हल्ल्यात तरुण जखमी ! बिबट्या असल्याची गावक-यांना शंका

 

Leave a Comment