रामराज्य प्रतिष्ठानतर्फे डाबकी रोड येथे गणेश विसर्जन घाट

रामराज्य प्रतिष्ठानतर्फे डाबकी रोड येथे गणेश विसर्जन घाट

रामराज्य प्रतिष्ठानतर्फे डाबकी रोड येथे गणेश विसर्जन घाट
अकोला – नागरीकांच्या सोयीकरिता जागोजागी कृत्रिम गणेश विसर्जन घाटांची निर्मिती करुन मोठ्या भक्तीभावाने बाप्पांना निरोप देण्यात आला. यामध्ये रामराज्य प्रतिष्ठानचा सुद्धा दरवर्षीच सहभाग असतो. यामध्ये यावर्षी फडके नगर, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या समोर डाबकी रोड, अकोला येथे कृत्रिम गणेश विसर्जन घाटाची निर्मिती करण्यात आली होती. या गणेश विसर्जन घाटाला नागरीकांनी सुद्धा भरभरुन प्रतिसाद देत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्या लाडक्या बाप्पांना निरोप देत विसर्जन केले. या गणेश विसर्जन घाटाकरिता श्री साई लहरी बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्सने सौजन्य दिले असून गणेश विसर्जन उत्साहामध्ये व विधीवत पार पाडण्याकरिता रामराज्य प्रतिष्ठानचे संदीपभाऊ पवार, मनोजभाऊ गायकवाड यांच्या मार्गदर्शनात हर्षु बाबुराव चौधरी, ऋषिकेश गावंडे, रजत हनपुडे, आनंद लकडे, संतोष रंगभाळ, प्रतिक काळे, गोपाल शर्मा, सुरज देशमुख, पियुष पागधुने, अक्षय लिखार, कपिल देशमुख, प्रमोद जाधव, ओम कुचर, जय असलमोल, अभि धानोरकर, सिद्धांत अहीर, छोटू वानखडे, कुणाल गावंडे, मृणाल गावंडे, अक्षय देवाते, हेमंत देशमुख, अंकुश कराळे, अनिकेत मोराखडे, सोनू मोकळकर आदींनी अथक परिश्रम घेतलेत.

CLASSIFIED जाहिराती फक्त १०० रु. १० दिवस–जाहिरात छोटी मात्र काम मोठे

स्पेशल ऑफर १००० रु जाहिरात १ महिना कॉल ७०२०५७५९३३

Leave a Comment