पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव स्पर्धेचे पुरस्कार वितरण..

पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव स्पर्धेचे पुरस्कार वितरण 

सामर्थ्य’तून समर्थ सामाजिक चळवळ निर्माण होईल – जोशी  
अकोला : सामर्थ्य फाउंडेशनच्या विविध समाजसेवी उपक्रमातून आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. आगामी काळात ‘सामर्थ्य’च्या माध्यमातून समर्थ सामाजिक चळवळ निर्माण होईल, असा विश्वास पर्यावरण अभ्यासक्र व ज्येष्ठ पक्षीमित्र दीपक जोशी यांनी व्यक्त केला.
सामर्थ्य फाउंडेशनद्वारेरविवारीटिळक पार्क येथे आयोजित पर्यावरणपूरकघरगुती गणेशोत्सव सजावट व देखावास्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख अतिथीम्हणून ते बोलतहोते.कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वसुधा देव, तर पुरस्कार प्रायोजक चिन्मय देव, संस्थेचे अध्यक्ष प्रबोध देशपांडे, सचिव डॉ. गजानन वाघोडे, स्पर्धा समन्वयक प्रवीण पळसपगार, सुर्यकांत बुडकले, प्रशांत चाळीसगांवकरयांचीव्यासपीठावरप्रामुख्याने उपस्थिती होती.
पाहुण्यांचे स्वागत वरिष्ठ उपाध्यक्ष विनोद देव, कायदेविषयकसल्लागारॲड. संतोष भोरे, कार्यकारिणी सदस्य श्रीराम देशपांडे, किरण चौक, दिनेश चंदन, विजय शिंदे, राजेंद्र निकुंभ, विलास राठोड, सुदर्शन देशपांडे, सुधीर धुळधुळे, मिलिंद शनवारे, मुकुंद देशमुख आदींनीकेले.पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेतशेकडोस्पर्धकांनी सहभाग घेऊनउत्स्फूर्त प्रतिसाद दिला. परीक्षक दीपक जोशी व ज्येष्ठ व्यंगचित्रकार गजानन घोंगडेयांनीस्पर्धकांच्यागणेशोत्सवाचेसुक्ष्मपणे निरीक्षण करूनस्पर्धेचा निकाल जाहीर केला.
प्रथम पुरस्काराचेमानकरी संजय देशमुख ठरले, द्वितीय पुरस्कार मेघा राजुरकर, तृतीय पुरस्कार राजेंद्र सोनवणे, तर प्रोत्साहनपरपारितोषिकासाठी ऋषिकेश मिलिंद गायकवाड व शीला जोशी यांनीनिवडपरीक्षकांनीकेली.मान्यवरांच्याहस्तेरोख पारितोषिक, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोपटेदेऊनविजेत्यास्पर्धकांचा सत्कार करण्यातआला.स्पर्धेत सहभागी इतर स्पर्धकांनादेखील प्रमाणपत्र व रोपटेदेऊनसन्मानितकरण्यात आले.
प्रथम पुरस्कार विजेते संजय देशमुख यांनीसंस्थेच्याकार्याविषयी आनंद व्यक्त करून पुरस्काराची राशीसंस्थेला दान केली.
पुढीलवर्षीच्यास्पर्धेसाठीत्यांनी तीन प्रोत्साहनपरपारितोषिकाचीदेखील घोषणा केली.
संगीत वात्सल्य स्वरांगणचे अध्यक्ष सतीश खोडवेयांनीगायलेल्यागाण्याने रसिक मंत्रमुग्ध झाले.
पर्यावरणपूरकसजावटीचे अनेक कल्पक मार्ग गणेशभक्तांनीशोधलेआहेत.
मातीचीगणेशमूर्ती व पर्यावरणस्नेहीसाहित्याची सजावट करणाऱ्यागणेशभक्तांनास्पर्धेतून प्रोत्साहित करण्यातआल्याचेसंस्थाध्यक्ष प्रबोध देशपांडे यांनीप्रास्ताविकातसांगितले.संस्थेद्वारेराबविण्यातयेणाऱ्या विविध उपक्रमाचीमाहितीॲड. संतोष भाेरेयांनीदिली.
सामर्थ्य फाउंडेशन एका ध्येयाने स्थापन झालीआहेआणिअल्पावधीतचत्यादृष्टीनेवाटचालसुरूकेली.
नदीच्याप्रवाहासारखे निरंतर सुरूअसलेलेसंस्थेचे कार्य पुढेजाऊननिश्चितचसमुद्रासारखे विशाल होईल.सामर्थ्यचे सामाजिक कार्य दिशादर्शकठरणार आहे,
असे मत डॉ. वसुधा देव यांनीअध्यक्षस्थानावरून व्यक्त केले.कार्यक्रमाचेसूत्रसंचालनप्रा.डॉ.अशोकसोनोन यांनी, तर आभार डॉ. गजानन वाघोडेयांनीमानले.
                                                                   निसर्गाच्या सानिध्यात कार्यक्रम
सामर्थ्य फाउंडेशनच्या पर्यावरणपूरक स्पर्धेचा पुरस्कार
वितरण सोहळाटिळक पार्क येथे अभिनव पद्धतीनेनिसर्गाच्यासानिध्यातमोकळ्याजागेतघेण्यातआला.
यावेळीस्पर्धक व विजेत्यांनारोपटेवाटपकरूनवृक्षारोपण व संवर्धनाचा संकल्प करण्यातआला.
गणेशोत्सवातसंस्थेच्यावतीने सार्वजनिक मंडळांनाहीरोपट्यांचेवाटपकरण्यातआले.

Leave a Comment