ऑक्टोबर महिन्यासाठी जीवनावश्यक वस्तू वाटप परिमाण निश्चित

ऑक्टोबर महिन्यासाठी जीवनावश्यक वस्तू वाटप परिमाण निश्चित

अकोला, दि. 21(जिमाका)- जिल्ह्याकरीता माहे ऑक्टोंबर महिन्यासाठी  लक्ष्य निर्धारीत सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्य, नियंत्रित साखर इ. जीवनावश्यक वस्तूंचे वाटप परिमाण निश्चित करण्यात आले आहे.

वाटप परिमाण व दर याप्रमाणे-

१.      प्राधान्य गटातील लाभार्थ्यांसाठी गहू दोन किलो प्रतिव्यक्ती,दर दोन रुपये प्रति किलो.

२.      प्राधान्य गटातील लाभार्थ्यांसाठी तांदूळ तीन किलो प्रतिव्यक्ती, तीन रुपये प्रति किलो.

३.      अंत्योदय अन्न योजना गहू- 15 किलो प्रति कार्ड, दोन रुपये प्रति किलो.

४.    अंत्योदय अन्न योजना तांदूळ- 20  किलो प्रति कार्ड, तीन रुपये प्रति किलो.

५.     नियंत्रित साखर अंत्योदय लाभार्थ्यांना लहानमोठा भेदभाव न करता साठ्याचे उपलब्धेनुसार एक किलो

      प्रति शिधापत्रिका, 20 रुपये प्रतिकिलो.

    हे वाटप परिमाण गोदामातील साठ्याच्या व लाभार्थ्यांच्या संख्या उपलब्धतेनुसार राहील,असे जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यु. काळे यांनी कळविले आहे.

Leave a Comment