नेहरू युवा केंद्रातर्फे रविवारी (दि.१४) सायकल रॅली

नेहरू युवा केंद्रातर्फे रविवारी (दि.१४) सायकल रॅली

नेहरू युवा केंद्रातर्फे

अकोला : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत नेहरू युवा केंद्रातर्फे रविवार दि. १४ रोजी सकाळी साडेसहा वा. सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी  कार्यालय अकोला ते बार्शीटाकळी व परत जिल्हाधिकारी कार्यालय अशा या भव्य सायकल रॅलीत जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयाचे कर्मचारी, नेहरू युवा केंद्राचे युवक, अकोला सायकल असोसिएशनचे सदस्य, महाविद्यालयीन युवक युवती, एन. सी. सी, एन. एस. एस. चे विद्यार्थी, एनजीओ सदस्य व अन्य नागरीक आपल्या सायकल वर तिरंगा झेंडा लावुन सहभागी होतील.या उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. इच्छुकांनी आपली सायकल घेऊन त्यावर राष्ट्रीय ध्वज लावुन जिल्हाधिकारी अकोला कार्यालयाजवळ दि.१४ रोजी सकाळी सहा वा. पर्यंत पोहोचावे. सहभागी होण्यासाठी दीपक घुगे (मोबाईल ७९७२४०५६३०)न्यु शर्मा ब्रदर्स, जुना इनकम टॅक्स   चौक, गोरक्षण रोड, अकोला येथे दि. १३ पर्यंत नोंदणी करावी, असेही कळविण्यात आले आहे.

Leave a Comment