नेहरू कप हॉकी क्रीडा स्पर्धा; स्कुल ऑफ स्कॉलर्स, जी. एस. कॉन्व्हेंट, एल.डी.पटेल हायस्कुल व समर्थ पब्लिक स्कूलचे यश

नेहरू कप हॉकी क्रीडा स्पर्धा; स्कुल ऑफ स्कॉलर्स, जी. एस. कॉन्व्हेंट,

एल.डी.पटेल हायस्कुल व समर्थ पब्लिक स्कूलचे यश

नेहरू कप हॉकी क्रीडा स्पर्धा

अकोला : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तर नेहरू कप हॉकी (मनपा व जिल्हाक्षेत्र) क्रीडा स्पर्धा २०२२-२३ चे आयोजन दि. ८ व ९ रोजी कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, अकोला येथे पार पडल्या.

अंतिम निकाल या प्रमाणे- (मनपा क्षेत्रातील संघ) १५वर्ष मुले-स्कुल ऑफ स्कॉलर्स,हिंगणा रोड, १७ वर्ष मुले- जि. एस. कॉन्व्हेट व एल.डी. पटेल. हायस्कुल, १७ वर्ष मुली- स्कुल ऑफ स्कॉलर्स, हिंगणा रोड,

(जिल्हा क्षेत्रातील संघ) १५ वर्ष मुले – श्री. समर्थ पब्लीक स्कुल, रिधोरा, १७ वर्ष मुले- श्री. समर्थ पब्लीक स्कुल, रिधोरा, १७वर्ष मुली- श्री. समर्थ पब्लिक स्कुल, रिधोरा.

या स्पर्धेचे पंच म्हणून विजय झटाले, अभिषेक पाठक, प्रशांत कमळाकर, विक्रांत अंभोरे, मयुर निंबाळकर, स्वप्निल अंभोरे, मयुर चौधरी, धिरज चव्हाण यांनी काम पाहीले. ही स्पर्धा यशस्वी करण्याकरीता स्पर्धा संयोजक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Comment