सेवा पंधरवाडा अंतर्गत नवरात्रोत्‍सव – 2022 करिता 20 सप्‍टेंबर पासून मनपात एक खिडकी कार्यान्‍वीत.   

सेवा पंधरवाडा अंतर्गत नवरात्रोत्‍सव – 2022 करिता 20 सप्‍टेंबर पासून मनपात एक खिडकी कार्यान्‍वीत.   

अकोला दि. 21 सप्‍टेंबर 2022 – शासनाच्‍या सुचनेनुसार आणि मनपा आयुक्‍त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांच्‍या आदेशान्‍वये अकोला महानगरपालिका प्रशासनाव्‍दारे दि. 17 सप्‍टेंबर ते 2 ऑक्‍टोंबर 2022 या कालाधीत ‘‘राष्‍ट्रनेता ते राष्‍ट्रपिता सेवा पंधरवाडा’’ साजरा करण्‍यात येत आहे.

 अकोला शहरात सार्वजनिक नवरदुर्गा उत्‍सव मंडळांव्‍दारे सार्वजनिक ठिकाणी बसविण्‍यात येणा-या नवदुर्गा मंडपासाठी लागणा-या विविध परवानग्‍या घेण्‍याचे काम अधिक सोईचे व्‍हावे तसेच या कामात सुसुत्रता येण्‍याचे दृष्‍टीने मनपा आयुक्‍त यांच्‍या आदेशान्‍वये अकोला महानगरपालिकेच्‍या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुख्‍य सभागृह येथे सेवा पंधरवाडा अंतर्गत एक खिडकी योजना प्रणाली कार्यान्‍वीत करण्‍यात आली आहे. याव्‍दारे नवदुर्गा उत्‍सव साजरा करण्‍यासाठी लागणारी मनपा नगररचना विभाग, मनपा अग्निशमन विभाग, शहर वाहतूक पोलीस विभाग, पोलीस विभाग आणि महाराष्‍ट्र  राज्‍य विद्युत वितरण कंपनी, अकोला यांच्‍या सर्व प्रकारच्‍या परवानग्‍या एकाच छताखाली मिळणार आहे.

          आज मनपा एक खिडकीतून अकोला शहरातील एकुण 56 नवदुर्गा उत्‍सव मंडळांनी परवानग्‍या  घेतलेली आहे. यावेळी अकोला महानगरपालिका नगररचना विभागातील सहा.नगररचनाकार राजेंद्र टापरे, कनिष्‍ठ अभियंता अक्षय बोराडे, प्रतीक कट्यारमल, तुषार जाने, रितेश टेकाडे, अग्निशमन विभागाचे शुभम बोराडे, शुभम वाघ, पोलीस विभागाच्‍या आरती शिरसाट, सुषमा रंगारी, अकोला शहर वाहतुक शाखेचे एच.सी.चिंचोलकर, दिपाली नारनवरे, महाराष्‍ट्र  राज्‍य विद्युत वितरण कंपनी, अकोला  चे आकाश बुंदेले आदिंची उपस्थिती होती.

          शहरातील सर्व नवदुर्गा उत्‍सव मंडळांच्‍या पदाधिकारी यांना अकोला महानगरपालिका प्रशासनाव्‍दारे आवाहन करण्‍यात येत आहे त्‍यांनी या योजनेचा लाभ घेऊन नवदुर्गा उत्‍सव साजरा करण्‍यासाठी लागणा-या सर्व परवानग्‍या घेउन हा सण उत्‍साहाने साजरा करावा.  

—————————————————————————————————————

सेवा पंधरवाडा अंतर्गत मनपात शिक्षक अणि मुख्‍याद्यापकांसाठी आनापान साधना वर्ग कार्यशाळा संपन्‍न.

अकोला दि. 21 सप्‍टेंबर 2022 – अकोला महानगरपालिका प्रशासनाव्‍दारे दि. 17 सप्‍टेंबर ते 2 ऑक्‍टोंबर 2022 या कालाधीत ‘‘राष्‍ट्रनेता ते राष्‍ट्रपिता सेवा पंधरवाडा’’ साजरा करण्‍यात येत असून अकोला महानगरपालिकेच्‍या   डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुख्‍य सभागृह येथे अकोला मनपा अधिनस्‍त शाळेतील दुपारच्‍या सत्रातील मुख्‍याद्यापक आणि शिक्षकांसाठी (MITRA-Mind in Training for Awareness) आनापान साधना वर्ग उपक्रमाबाबत कार्यशाळाचे आयोजन करण्‍यात आले होते. या शेवटच्‍या कार्यशाळेत प्रशिक्षक आणि मार्गदर्शक म्‍हणून ज्ञानेश्‍वर खैरे, जे.जे.भगत, डी.बी.तायडे, एस.ए.रजाने, के.टी.सोनटक्‍के, शिवहरि ढोंबे यांची उपस्थिती होती.

            या कार्यशाळेचे संत्र संचालन अर्जुन हिंगमेरे यांनी केले तर आभार प्रदर्शन कविता शर्मा यांनी केले. तसेच यावेळी  शिक्षण विभागाच्‍या डॉ.शाहीन सुल्‍ताना तसेच दुपारच्‍या सत्रातील शाळांचे मुख्‍याद्यापक आणि शिक्षक/शिक्षिकांची उपस्थिती होती.

————————————————————————————————————————-

सेवा पंधरवाडा अंतर्गत विशेष स्‍वच्‍छता मोहीमे दरम्‍यान फ्लाय ओव्‍हर पुलाची स्‍वच्‍छता.

अकोला दि. 21 सप्‍टेंबर 2022 – अकोला महानगरपालिका प्रशासनाव्‍दारे दि. 17 सप्‍टेंबर ते 2 ऑक्‍टोंबर 2022 या कालाधीत ‘‘राष्‍ट्रनेता ते राष्‍ट्रपिता सेवा पंधरवाडा’’ साजरा करण्‍यात येत असून मनपा आयुक्‍त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांच्‍या आदेशान्‍वये महानगरपालिका क्षेत्रात आरोग्‍य विभाग स्‍वच्‍छता विभागाव्‍दारे दैनंदिन होणा-या स्‍वच्‍छते सोबत शहरातील विविध भागात विशेष स्‍वच्‍छता मोहीम घेण्‍यात येत असून आज दि. 21 सप्‍टेंबर रोजी आरोग्‍य स्‍वच्‍छता विभागाव्‍दारे शहरातील मध्‍य भागी असलेले फ्लाय ओव्‍हर पुलाची स्‍वच्‍छता करण्‍यात आली.

————————————————————————————————————————-

 सेवा पंधरवाडा मनपाच्‍या तक्रार कक्ष येथे विविध विभागातील एकुण 20 अर्ज/तक्रारी प्राप्‍त.

अकोला दि. 21 सप्‍टेंबर 2022 – अकोला महानगरपालिका प्रशासनाव्‍दारे दि. 17 सप्‍टेंबर ते 2 ऑक्‍टोंबर 2022 या कालाधीत ‘‘राष्‍ट्रनेता ते राष्‍ट्रपिता सेवा पंधरवाडा’’ साजरा करण्‍यात येत असून महानगरपालिका क्षेत्रातील सर्व सामान्‍य जनतेकरिता पुरविण्‍यात येणा-या सेवा विषयक प्रलंबीत व प्राप्‍त तक्रारींचा निपटारा करण्‍याकरिता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले असून यामध्‍ये नागरिकांच्‍या समस्‍या, अर्ज/तक्रारींचे निराकरण विहित कालावधीमध्‍ये व्‍हावे याकरिता मनपाच्‍या स्‍थायी समिती सभागृहात तक्रार कक्ष कार्यान्‍वीत करण्‍यात आले असून आज दि. 21 सप्‍टेंबर रोजी नागरिकांव्‍दारे या कक्षास विविध विभागाशी संबंधीत एकुण 20 तक्रारी प्राप्‍त झाल्‍या आहे, ज्‍यामध्‍ये कर वसुली विभाग, आरोग्‍य स्‍वच्‍छता विभाग, बांधकाम विभाग, अभिलेखा विभाग, विद्युत विभाग, शिक्षण विभाग, जलप्रदाय विभाग, अतिक्रमण विभाग यांचा समावेश आहे.

          अकोला शहरातील नागरिकांनी या सेवा पंधरवाडाचा लाभ घेउन आपली समस्‍या, अर्ज/तक्रारी मनपाच्‍या तक्रार कक्ष येथे सादर करून सहकार्य करण्‍याचे आवाहन मनपा आयुक्‍त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांनी केले आहे.  

————————————————————————————————————————-

Leave a Comment