मुंगीलालच्या गरबा महोत्सवात यंदा गुजरातच्या राजकोटची अस्सल संगीत टीम

मुंगीलालच्या गरबा महोत्सवात यंदा गुजरातच्या राजकोटची अस्सल संगीत टीम

मुंगीलालच्या गरबा महोत्सवात यंदा गुजरातच्या राजकोटची अस्सल संगीत टीम
दि.26 सप्टें.ते 4 ऑकटो पर्यंत चालणार भक्तिभाव व संस्कृतीचा रंगारंग गरबा  

अकोला-श्री गुजराती नवरात्री महोत्सव समितीच्या वतीने महानगरातील मुंगीलाल विद्यालयाच्या प्रांगणात सोमवार दि.26 सप्टें.ते 4 ऑकटो.पर्यंत गरबा  महोत्सव आयोजित करण्यात आला असून महोत्सवाचे हे अठरावे वर्ष आहे.

यावर्षीही या  गरबा महोत्सवात अकोलकर नागरिकांसाठी गुजरातची अस्सल सांस्कृतिक लोकधारा गरब्याच्या रूपाने बघावयास मिळणार असल्याची माहिती

स्थानीय मुंगीलाल विद्यालय प्रांगणात मंगळवारी आयोजित गरबा महोत्सवाच्या पत्रकार परिषदेत समितीचे हरीश लाखानी यांनी दिली.या आयोजनात गुजराती समाजाच्या व्यतिरिक्त इतर समाजातील गणमान्य

मान्यवर सहभागी होत असून कोविड नंतरच्या प्रदीर्घ कालावधीनंतर हा उत्सव नव्या रुपात होत असून महानगराच्या सांस्कृतिक शिरपेचात हा उत्सव मानाचा तुरा झाला आहे.यावर्षी दर्शकांचा प्रवेश हा पारंपरिक गेट मधून न होता तो सर्वोपचार रुग्णालय

समोरील मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारातून दिल्या जाणार आहे.यंदा आतच दुचाकी व चारचाकी वाहनांच्या पार्किंगची प्रशस्त व्यवस्था करण्यात आली आली असून जुन्या प्रवेश

द्वारासमोर आता भव्य स्टेज राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.मातेच्या पूजा अर्चना व जागरणाचे प्रतीक म्हटल्या जाणाऱ्या या नवरात्राच्या गरबा महोत्सवात घट स्थापना,दैनिक चंडीपाठ,दैनिक आरती,पूजन करण्यात येत असते तर अष्टमी दिनी प्रांगणात होम हवन करून शुचिर्भूतता निर्माण करण्यात येत

असल्याचे यावेळी लाखानी यांनी सांगितले.गरबा महोत्सवात यावर्षी गुजरातच्या अस्सल लोककलेची पारख असणाऱ्या गुजरातच्या राजकोट येथील प्रख्यात महेश जोशी यांच्या रोहन बिट्सचे संगीत कलाकार हजेरी लावून गुजरातचे हे कलाकार आपल्या संगीतमय आवाजाची

जादू या ठिकाणी पारंपरिक गरब्याच्या रूपाने साकार करणार आहेत. महिला -मुलींच्या सुरक्षितता व बसण्याच्या संदर्भात समितीने चोख सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्यात आली असून या वर्गासाठी स्वतंत्र बसण्याची

व्यवस्था राहणार आहे.तसेच प्रवेश हा पासेस द्वारेच देण्यात येणार असून सीसीटीवी व महिला गार्डची व्यवस्था या ठिकाणी राहणार आहे.

यावर्षी महोत्सवात फूड झोन मध्ये स्वादिष्ठ व्यंजनासोबतच आनंद मेळ्याच्या धर्तीवर विविध प्रकारच्या खेळांचे स्टाल लावण्यात येणार आहेत.

उत्तम विद्युत व ध्वनी व्यवस्था हे या महोत्सवाचे आकर्षण असून ते सर्वाना जागेवरच थिरकावयास लावणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

महोत्सव चांगल्या पद्धतीने व्हावा यासाठी प्रशासनाच्या सूचना व निर्देशांचे वेळोवेळी पालन करण्यात येणार आहे. गरब्यात यावर्षीही भरपूर व आकर्षक पुरस्कार देण्यात येणार आहेत.तसेच उत्तम गरबा  खेळणाऱ्या तीन महिला-मुलीस पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

यावर्षी हा महोत्सव सर्वसमावेशक व्हावा यासाठी समितीच्या वतीने आयएमए,रोटरी,लायन क्लब, इनरव्हील समवेत अनेक सेवाभावी सामाजिक संस्था संघटनाना व राज्य व राष्ट्रातील ख्यातनाम मान्यवरांना महोत्सवात निमंत्रित करून त्यांचा सहभाग घेण्यात येणार आहे.

दि.26 सप्टें.रोजी घट स्थापना दिनी सायं.7 वा.मुंगीलाल विद्यालय प्रांगणात मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित या गरबा  महोत्सवाच्या उदघाटन सोहळ्यास व नित्य गरबा  बघण्यास नागरिक महिला-पुरुषांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.

आभार हेमेन्द्र राजगुरू यांनी मानले.या पत्रकार परिषदेत समिती अध्यक्ष वालजीभाई पटेल,महिला मंडल अध्यक्ष शितलबेन रुपारेल,दिलीपभाई सोनी,आशिष वखारीया, विनोदभाई धाबलिया,

मनोजभाई भीमजियानी,प्रकाश लोढिया,अरविंदभाई पटेल, भरतभाई मकवाना, किरीटभाई शाह,जगदीश भाई पटेल,अमरिश पारेख, संजय कोरडीया,पराग शाह, विशाल शाह,पियूषभाई संघवी,दर्शनभाई शाह,

कपिल ठक्कर,सुनील कोरडीया, जयंत संघवी,प्रफुल्ल सोनी, रूपाबेन शाह भावनाबेन वाघेला,नीताबेन संघवी, नमिताबेन मेहता,दुर्गाबेन जोशी,छायाबेन लाखानी, हिनाबेन राजगुरू,रमाबेन सोनी,

दीपाबेन धाबलिया, संगीताबेन भीमजीयानी,

जागृतीबेन लोढीया,उमाबेन वाघेला,सरलाबेन मेहता,वर्षाबेन संघवी,प्रज्ञाबेन पंचमिया,

संगीताबेन चौहान,रसीलाबेन

धामेचा,हंसाबेन भाटिया,मोनाबेन वोरा,कल्पनाबेन

गांधी,मयुरीबेन गोहेल,

लताबेन श्रॉफ,हर्षाबेन वोरा आदी उपस्थित होते.

Leave a Comment