Video : प्रवासी निवाराचा स्लॅब कोसळुन एका युवकाचा मृत्यू

प्रवासी निवाराचा स्लॅब कोसळुन एका युवकाचा मृत्यू

अकोला : काल दिनांक 13 शनिवार च्या रात्री जीर्ण अवस्थेत असलेल्या बार्शीटाकळी तालुक्यातील जमकेश्वर येथील प्रवासी निवा-याचा स्लॅब कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या प्रवासी निवा-याच्या आत फोनवर बोलत असलेला वय अंदाजे 22 वर्षाच्या युवकावर अचानकपणे पुर्ण स्लॅब कोसळला आणी तो त्याखाली दबल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे मृत युवकाच विकी वसंत कोकरे (वय २२) नाव आहे

या घटनेची माहिती पिंजर येथील ठाणेदार अजयकुमार वाढवे यांनी मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना दिली होती दरम्यानच्या वेळीच सदाफळे यांनी आपल्या टीम सोबत घटनास्थळी जाउन पुर्णपणे स्लॅबखाली तो युवक दबल्याचे लक्षात आले क्षणाचाही विलंब न करता टेक्नीकलरीत्या चक्क स्लॅब फोडणे चालु केले.आणी लगेचच अवघ्या विस मिनीटात मलब्याखाली दबलेला युवकाला बाहेर काढले मात्र
तोपर्यत या दुर्घटनेत विकीचा मृत्यू झाला होता.

यावेळी पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजयकुमार वाढवे पिएसआय बंडू मेश्राम ,बेलोरकार उपस्थित होते.तसेच सरपंच ठोंबरे जमकेश्वर उपसरपंच नितीन गवई धाकली, राकाॅचे ता.प्र.सतीश पाटील गावंडे,पं.स. राधेश्याम खरतळे, पंसं.सिहासन जाधव, पो.पा.देशमुखसह यावेळी गावकरी मोठया प्रमाणावर जमलेले होते अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दीली आहे.

असेच अकोला जिल्ह्यांमध्ये अनेक जीर्ण झालेले इमारती, प्रवासी निवारे आहेत या जीर्ण झालेल्या बाबी कडे कोण लक्ष देणार आपल्याला तर फक्त देशभक्ती चा देखावा करून नागरिकांच्या मतांची देणे घेणे आहे ना…. अकोला जिल्ह्यात जीर्ण झालेली इमारती घरे प्रवासी निवारे सर्वांचा सर्व्हे झाला का की फक्त कागदोपत्रीच झाला असाही प्रश्न नागरिक करीत आहेत तीन दिवसांपूर्वी अकोल्यातील काला चबुतरा ट्रस्ट च्या इमारतीचा पश्चिमेकडील असलेली भिंत जीर्ण झाल्याने रात्री पडली होती त्या वेळी दुकाने व ग्राहकांची गर्दी नसल्याने कोणतीही जीवित हानी झाली नव्हती मात्र शहरात व जिल्ह्यातील अश्या जीर्ण अवस्थेत असलेल्या इमारतींचे काय ?

व्हिडिओ पहा 👇

 

Leave a Comment