महानगरात छायाचित्रकारांची निघणार कॅमेरा दिंडी शहरात होणार जागतिक फोटोग्राफीचा प्रवास

महानगरात छायाचित्रकारांची निघणार कॅमेरा दिंडी
शहरात होणार जागतिक फोटोग्राफीचा प्रवास

अकोला-छायाचित्रकार हा क्षणांचा साक्षीदार असतो.

तो आपल्या सुख दुःखांचे प्रत्येक प्रतिबिंब टिपतो. जगाला प्रभावित करण्याची किमया ही केवळ छायाचित्रकारातच आहे.

अश्या या छायाचित्रकारांची नव्याने ओळख व्हावी,त्यांच्या कार्याचे चिज व्हावे यासाठी महानगरात छायाचित्रकारांचा भव्य उत्सव आयोजित करण्यात आला आहे.

छायाचित्रकारांच्या प्रगतीसाठी कार्यरत असणाऱ्या अकोला-बुलडाणा जिल्हा फोटोग्राफर्स असो.च्या वतीने

जागतिक छायाचित्र दिनाच्या निमित्ताने शुक्रवार दि 19 ऑगस्ट रोजी

सकाळी 9 वाजता स्थानीय राजेश्वर मंदिर पासून भव्य कॅमेरा दिंडीचे आयोजन करण्यात आले असून

संपूर्ण छायाचित्रकारांच्या एकजुटीने प्रदर्शन घडविण्या ऱ्या या दिंडीत छायाचित्रकार आपापल्या कॅमेरा समवेत या दिंडीत सहभागी होणार असल्याची माहिती

असो.च्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.या दिंडीचे उदघाटन जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या हस्ते होणार असून

ही दिंडी राजेश्वर मंदिर पासून प्रारंभ होऊन जयहिंद चौक,मोठा पूल, सिटी कोतवाली,गांधी चौक,मनपा चौक मार्गे स्वराज्य भवन परिसरात येऊन या ठिकाणी या दिंडीचा समारोप होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

 

छायाचित्रकारांचा आपसात सुसंवाद वाढावा,स्नेह वृदीगत व्हावे यासाठी असो.च्या वतीने छायाचित्रकार सदस्यासाठी दि 19 ऑगस्ट रोजी दु 2 वाजता रिधोरा रस्त्यावरील हॉटेल तुषार येथे सप्तरंग,वार्षिक आनंदोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या उत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत,अन्नपूर्णा माता मंदीरचे विश्वस्त अन्नपूर्णेश पाटील उपस्थित राहणार आहेत.

छायाचित्रकारांच्या कुटुंबासाठी आयोजित या कार्यक्रमात महिलांसाठी रांगोळी, संगीतखुर्ची,दहीहंडी,कॅमेरा पूजन,पारंपरिक वेशभूषा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांची धम्माल राहणार आहे.

असो.च्या वतीने प्रथमच हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. महानगरातील व्यावसायिक व हौशी फोटोग्राफर हे छायाचित्रच नव्हे तर सिनेमा,लुघपट,डॉक्युमेंट्रीशी प्रामाणिक पणे जुळलेले आहेत.

फोटोग्राफी म्हणजे आवड,करियर,पॅशन,व्यावसायिक व हौशी दृष्टीकोन की समाज भान ? अशा विविध विषयांचे निरसन या माध्यमातून होणार आहे.असो.सातत्याने संघटन समवेत सामाजिक दायित्व पण जोपासत असते.

असो.अंतिम श्रावण सोमवारी राजराजेश्वर पालखीचा स्वागत कार्यक्रम आयोजित करीत असते. तसेच गणेश विसर्जन मिरवणूक छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनीचे आयोजन करते.काटेपूर्णा अभयारण्य फोटो वॉक स्पर्धा व सफारीचे सातत्याने आयोजन करून कलेस वाव देत असते.

छायाचित्रकारांसाठी कौटुंबिक कोजागिरी पर सांस्कृतिक कार्यक्रम साकार करते.

असो.च्या वतीने गरजूंना १०० ब्लॅकेट वितरण करण्यात येते.तसेच जेष्ठ छायाचित्रकार पद्मश्री सुधारक ओलवे यांची कार्यशाळा व प्रदर्शनी आयोजित केली होती.

असो. महिला दिनी फोटोग्रॉफर महिलांचा सत्कार करीत असते.कोरोना काळात असो ने गरजू 45 छायाचित्रकारांना एक महिन्याचे जीवनावश्यक साहित्य व किराणा किट वितरित करीत आपले दायित्व जोपासले.

जगदीशभाई इंगळे यांचा जिल्हाधिकारी कार्यालय च्या गच्ची वर चढून आत्मदहनाचा प्रयत्न

त्याच प्रमाणे असो.ने अनेक उपक्रम राबविलेत.त्यात जितके सभासद तितके

वृक्षारोपण, सर्व छायाचित्रकारांना समान दरपत्रक, प्रसिद्ध प्रशिक्षक राजा अवस्थी यांची कार्यशाळा,कोव्हीड काळात शासन दरबारी वारंवार निवेदन देवुन फोटोग्राफर हिताचे निर्णय घेण्यासाठी विनंती करण्यात आली.

विवाह सेवा संघर्ष समिति मध्ये सहभागी होऊन फोटोग्राफरच्या विविध मागण्यासाठी तीव्र आंदोलन करण्यात आले.छायाचित्रकारांच्या आरोग्यसाठी होम हवन करण्यात आले.

तसेच त्यांच्यासाठी विमा शिबिराचे आयोजन करून भविष्य सुरक्षित करण्यात आले.

असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.दि 19 ऑगस्ट रोजी आयोजित

या कॅमेरा दिंडी मध्ये सर्व छायाचित्रकार व संलग्न असोच्या पदाधिकारी वर्गाने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.

या पत्रकार परिषदेत यावेळी अकोला-बुलडाणा जिल्हा फोटोग्राफर्स

असो,चे अध्यक्ष अध्यक्ष नरेंद्र नायसे, उपाध्यक्ष नीरज भांगे,दिग्विजय देशमुख,सचिव नितीन देशमुख, सहसचिव राहुल गोटे,

दत्तात्रय सरोदे, उमेश चाळसे, कोषाध्यक्ष योगेश उन्होने,सदस्य सुशील बडेरे,शामसुंदर बाळे,विशाल खंडारे,महेश इंगळे,हर्षल गढेकर,गौरव ढोरे,राहुल ताडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.


1 thought on “महानगरात छायाचित्रकारांची निघणार कॅमेरा दिंडी शहरात होणार जागतिक फोटोग्राफीचा प्रवास”

Leave a Comment