महानगरात भव्य होणार महाराजा अग्रसेन जयंतीचा सोहळा

महानगरात भव्य होणार महाराजा अग्रसेन जयंतीचा सोहळा

महानगरात भव्य होणार महाराजा अग्रसेन जयंतीचा सोहळा
जयंती दिनी “अग्र विभूती” व अग्र-आयकाँन पुरस्कार
अकोला..सकल अग्रवाल समाजाचे आराध्य छत्रपती महाराजा श्री अग्रसेन यांच्या जयंतीचा सोहळा आयोजित करण्यात आला असून

यात अनेक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती अग्रवाल  समितीच्या वतीने संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

स्थानीय अग्रसेन भवन येथे संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत या वार्षिक जयंती उत्सवाची माहिती देण्यात आली.

यावेळी अग्रवाल  समितीचे अध्यक्ष डॉ जुगल चिरानिया,

समितीचे सचिव एड सुरेश गुरुजी,अग्रसेन भवन ट्रस्टचे अध्यक्ष गिरीश अग्रवाल,

महाराजा अग्रसेन भवन ट्रस्टचे अध्यक्ष वसंत बाछुका,

महिला मंडळ अध्यक्षा सौ कृष्णा पाडीया,नवयुवक मंडळ अध्यक्ष दीपक अग्रवाल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मुख्य जयंती सोहळा हा दि.26 सप्टेंबर साय 6-30 रोजी अग्रसेन भवन येथे होणार आहे.

या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून अ.भा.टिम्बर सा मिल असो.चे राष्ट्रीय अध्यक्ष कोलकाता येथील नवल केडीया,

जेष्ठ उद्योजक व रोटरी डिस्ट्रिक्ट 3030चे माजी प्रांतपाल अमरावती येथील किशोर केडीया उपस्थित राहणार आहेत.

या दिनी दु 3-30 वाजता स्थानीय राणी सती धाम येथून महाराजा अग्रसेन यांची भव्य शोभायात्रा निघणार असून

यात विविध झाकी व देखावे राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

जयंती दिनी जिल्ह्यात महीलांच्या शैक्षणिक विश्वात वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक,

माजी आमदार स्व राधादेवी किसनलाल गोयनका यांना मरणोपरांत अग्रवाल  समाजाचा

मानाचा “अग्र विभूती” पुरस्कार बहाल करण्यात येऊन त्यांच्या कार्यास उजाळा देण्यात येणार आहे.

या सोहळ्यात समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या समाजसेवीना

अकोला अग्र-आयकाँन हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते बहाल करण्यात येणार आहे.

यात राणी सती धामचे अध्यक्ष जगदीश प्रभूदयाल बाछुका,संत तुकाराम कर्करोग रुग्णालयाचे अध्यक्ष

गिरीश गंगाधर अग्रवाल,जनता बँकेचे माजी अध्यक्ष रमाकांत उमाशंकर खेतान,

जेष्ठ समाजसेवी निरंजन भगवानदास अग्रवाल ,जेष्ठ वैद्यकीय तज्ञ डॉ के.के.अग्रवाल,आदींचा समावेश आहे.

जयंती उपक्रमाचा प्रारंभ शनिवार दि.17 सप्टेंबर पासून भवन परिसरात जेष्ठ समाजसेवी गणपतराय खेतान

यांच्या द्वारे श्री गणेश पूजनाने करण्यात येणार आहे.या दिनी भवन परिसरात दुपारी 2 वाजता महिला मंडळाचा शाकंबरी मंगलपाठ होणार आहे.

रविवार दि 18 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता भवन परिसरात

महानगरातील सर्व नागरिकां साठी भव्य गेस्रोस्कोपी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

यात नागपूर येथील गेस्ट्रोइन्ट्रोलॉजिस्ट डॉ गौरव पाडीया हे रुग्ण तपासणी करणार आहेत.

अग्रवाल समिती व अग्रवाल मेडिकल सेवा संघाच्या संयुक्त विध्यमाने आयोजित या शिबिराचा लाभ घेण्याचे यावेळी आवाहन करण्यात आले.

तर दु 4 वाजता गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा होणार आहे.सोमवार दि19 सप्टेंबर रोजी दुपारी

भवन परिसरात पाककला, मेहंदी,सासू-सुनचे तालतंत्र, फॅन्सीड्रेस व चॉकलेट पासून रांगोळी काढा स्पर्धा होणार आहे.

मंगळवार दि 20 सप्टेंबर रोजी दुपारी भवन परिसरात ड्रेस मॅचिंग स्पर्धा,

ड्राय स्नेक,किटी पार्टी प्रोम्स व भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

बुधवार दि 21 सप्टेंबर रोजी दुपारी भवन परिसरात हेयर असेसरीज, तुलसी कुंडी सजवा,फॅन्सी ड्रेस अंताक्षरी आदी स्पर्धा होणार आहेत.

या दिनी संध्याकाळी गोकुळ कॉलोनी येथील महाराजा अग्रसेन भवन येथे युवक मंडळाचा भव्य आनंद मेळा होणार आहे.

गुरुवार दि 22 सप्टेंबर रोजी दुपारी अग्रसेन भवन येथे महिलांसाठी धान्य निवड स्पर्धा,कॉईनपासून दागिने बनवा व नृत्य स्पर्धा होणार आहे.

शुक्रवार दि 23 सप्टेंबर रोजी दुपारी अग्रसेन भवन येथे महिलांच्या कान्हाचे सिहासन सजवा,

हास्य खेळ व फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेतल्या जाणार आहेत.

शनिवार दि 24 सप्टेंबर रोजी अग्रसेन भवनात महिलांची नृत्य स्पर्धा होणार असून

या नंतर दुपारी वैद्यकीय वर्गाचा अंताक्षरी कार्यक्रम होणार आहे.

रविवार दि 25 सप्टेंबर रोजी सकाळी 6-30 वाजता अग्रसेन भवन येथून अग्रथॉन हा 5 किलोमीटर धावण्याचा कार्यक्रम होणार आहे.

या नंतर सकाळी 10 वाजता पासून भवन परिसरात ट्रायसिकल रेस,

चॉकलेट शोधा, संगीत खुर्ची,विज्ञान प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा, बलून फोडा स्पर्धा होणार आहेत.

याच दिनी दुपारी स्थानीय गोकुळ कॉलोनी येथील महाराजा अग्रसेन भवनात महिला मंडळाच्या वतीने

भव्य नृत्य नाटिका सादर करण्यात येणार आहे. सोमवार दि 26 सप्टेंबर रोजी

महाराजा अग्रसेन यांचा मुख्य जयंती सोहळा असून या दिनी अग्रसेन भवन येथे जयंती समारोह होणार आहे.

महाराजा अग्रसेन जयंती दिनी आपापल्या घरी रांगोळी,रोशनाई,

तोरण पताका व दीप प्रज्वलन करून महाराजा अग्रसेन यांची जयंती जल्लोषात साजरी करावी

असे आवाहन डॉ चिरानिया यांनी यावेळी केले.या पत्रकार परिषदेत अग्रवाल  समिती,

अग्रसेन भवन ट्रस्ट,महाराजा अग्रसेन भवन ट्रस्ट,महिला मंडळ,युवक मंडळ,भवन व्यवस्थापक गणेश अग्रवाल व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

“CLASSIFIED” जाहिराती

फक्त 500 रु. १5 दिवस–जाहिरात छोटी मात्र काम मोठे

स्पेशल ऑफर प्रोफेशनल जाहिरात १००० रु. १ महिना

कॉल ७०२०५७५९३३

Leave a Comment