लर्निंग लायसन्स बाबत लोकांचा बनावट प्रकार अकोल्यात आला समोर

लर्निंग लायसन्स बाबत लोकांचा बनावट प्रकार अकोल्यात आला समोर

अकोला : आता घरात बसूनच लर्निंग लायसन्स मिळत असल्याने अनेकांना काही व्याधी असतानाही लायसन्स दिले जाते. अंध, रातआंधळेपणा, बहिरेपणा, दिव्यांग असतानाही लायसन्स मिळते. परंतु पर्मनंट लायसन्स घेण्याची जेव्हा वेळ येते. तेव्हा मात्र लर्निंग लायसन्स मिळालेल्या लोकांचा बनावट प्रकार अकोल्यात समोर आला आहे.

काही वर्षांपूर्वी राज्य परिवहन महामंडळातील काही कर्मचाऱ्यांना रातआंधळेपणाची लक्षणे असतानाही त्यांना पर्मनंट लायसन्स देण्यात आले होते. परंतु हा बनावट प्रकार पुढे आरटीओंच्या सतर्कतेमुळे उघड झाला आणि एसटीतील रातआंधळेपणा घोटाळा समोर आला होता. आता तर शासनाने ऑनलाइन लर्निंग म्हणजेच फेसलेस घरबसल्या लायसन्स देण्याची व्यवस्था केली आहे. मोटारवाहन विभागाच्या संकेतस्थळावर गेल्यास, कागदपत्रे जोडल्यास, लर्निंग लायसन्स मिळविता येते. परंतु पर्मनंट लायसन्स काढतावेळी असे अनेक प्रकार अकोला आरटीओच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे असे लर्निंग लायसन्स अकोला आरटीओने रद्द केले आहेत. शासनाने ही योजना नागरिकांना कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात यासाठी सुरू केली आहे. मात्र या योजनेचा फायदा घेण्या ऐवजी नागरिक याचा दुरुपयोग करताना दिसत आहेत. यासाठी नागरिकांनी फेसलेस लायसन्स काढताना याचा दुरुपयोग न करता दिव्यांग व्यक्तीने टेस्ट देऊ नका, असे आवाहन आरटीओ कार्यालयामार्फत केले गेले आहे.

प्रतिक्रिया : जयश्री दुतोंडे, आरटीओ, अकोला

Leave a Comment