कोविडःआरटीपीसीआर चाचण्यांत तीन पॉझिटीव्ह, एक डिस्चार्ज

कोविडःआरटीपीसीआर चाचण्यांत तीन पॉझिटीव्ह, एक डिस्चार्ज

      अकोला दि.11(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 72 अहवाल प्राप्त झाले. त्यात तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तर एकाला डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म.3 व खाजगी 0)3+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह 3.

आरटीपीसीआर ‘तीन

आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यात एक पुरुष व दोन महिलाचा समावेश असून हे रुग्ण अकोला ग्रामीण, पातूर व मनपा क्षेत्रातील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

एक डिस्चार्ज

आज दिवसभरात एकाला डिस्चार्ज देण्यात आलाअशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

सक्रिय रुग्ण ‘25

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65859(49726+15142+991) आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 25 सक्रिय पॉझिटीव्ह रुग्ण आहेत, यातील चार रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत तर 21 जणांना होम आयसोलेशन मध्ये उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

 

CLASSIFIED जाहिराती फक्त १०० रु. १० दिवस–जाहिरात छोटी मात्र काम मोठे

स्पेशल ऑफर १००० रु जाहिरात १ महिना कॉल ७०२०५७५९३३

Leave a Comment