कोविडःआरटीपीसीआर चाचण्यांत पाच पॉझिटीव्ह, पाच डिस्चार्ज

कोविडःआरटीपीसीआर चाचण्यांत पाच पॉझिटीव्ह, पाच डिस्चार्ज

अकोला दि.7(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 113 अहवाल प्राप्त झाले. त्यात पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तर पाच जणांना डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म.5 व खाजगी 0)5+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह 5.

आरटीपीसीआर ‘पाच’

आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात दोन पुरुष व तीन महिलांचा समावेश असून हे रुग्ण अकोला ग्रामीण येथील एक तर मनपा क्षेत्रातील चार जण रहिवासी आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

पाच डिस्चार्ज

आज दिवसभरात पाच जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

सक्रिय रुग्ण ‘18’

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65848(49715+15142+991) आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 18 सक्रिय पॉझिटीव्ह रुग्ण आहेत, यातील चार रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत तर 14 जणांना होम आयसोलेशन मध्ये उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

AKOLA TIMES

स्पेशल ऑफर १००० रु जाहिरात १ महिना कॉल ७०२०५७५९३३

AKOLA TIMES

CLASSIFIED जाहिराती फक्त १०० रु. १० दिवस–जाहिरात छोटी मात्र काम मोठे

 

आधुनिक युगात इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आवश्यक – प्रा. पंढरीनाथ मांडवगणे

गणेशोत्‍सव – 2022, मनपाव्‍दारे गणपती विसर्जन घाट सज्‍ज.

 

शिक्षकांनी शिक्षणदानाचे काम व्यवसाय म्हणून न करता ध्येय म्हणून करावे – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Leave a Comment