खऱ्या घरकुल लाभार्त्यांना लाभ दया ! जिल्हा कचेरी समोर धरणे आंदोलन

खऱ्या घरकुल लाभार्त्यांना लाभ दया ! या मागणी करिता अकोला जिल्हा कचेरी समोर धरणे आंदोलन

खऱ्या घरकुल लाभार्त्यांना लाभ दया

खऱ्या गरजूंना घरकुलाचा लाभ मिळावा याकरिता बार्शीटाकळी पंचायत समितीच्या घरकुल कार्यालया विरोधात आज बार्शीटाकळी येथील भीमराव आत्माराम इंगळे राहणार। काजलेश्वर यांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले

हे सुद्धा वाचा – जगदीशभाई इंगळे यांचा जिल्हाधिकारी कार्यालय च्या गच्ची वर चढून आत्मदहनाचा प्रयत्न

बार्शीटाकळी पंचायत समितीच्या घरकुल विभागात मनमानी कारभार सुरू असल्यामुळे याची चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी मार्च 2022 पासून रमाई आवास योजना व पंतप्रधान आवास योजनेच्या तसेच इतर योजनेच्या घरकुल मंजूर असलेल्या गरजू लाभार्थ्यांच्या खात्यात पहिला हप्ता आतापर्यंत वाटप का करण्यात आला नाही याची चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करून त्वरित पहिला हप्ता देण्यात यावा कर्मचाऱ्यांच्या मनमानी पद्धतीने मार्च 2000 पासून ज्या लाभार्थ्यांच्या खात्यात घरकुलाचा पहिला हप्ता वाटप करण्यात आला त्यापैकी किती लाभार्थ्यांनी घरकुले बांधकाम केले याची मोका चौकशी करून घरकुलाचे बांधकाम न करणाऱ्या लाभार्थ्यांवर व संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी आदी मागण्यांकरिता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन करण्यात आले असून हे निवेदन आज जिल्हाधिकारी यांना देण्यात आले

बातमी व्हिडिओ पहा 👇

Leave a Comment