निंबोळी अर्काचा संग्रह व फवारणी बाबत कंकरवाडी येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

निंबोळी अर्काचा संग्रह व फवारणी बाबत कंकरवाडी येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नीत सुविदे फाउंडेशन अंतर्गत कृषी महाविद्यालय रिसोड येथील कृषीदुतांनी निंबोळी अर्क तयार करण्याची प्रक्रिया व फवारणी याविषयी शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले. निंबोळी अर्क म्हणजे कडूलिंब या झाडाच्या बियांपासून (निंबोळ्या) काढलेला अर्क. हा कडुलिंबाच्या झाडामध्ये असलेले अझाडिराक्टीन कीटकनाशकाचे काम करते. या निबोळ्यांपासून तयार केलेल्या अर्काचा पिकांवरील बऱ्याच किडीवर हवा तो परिणाम होतो. मावा, अमेरिकन बोंड अळ्या, तुडतुडे, पाने पोखरणाच्या व देठ कुरतडणाऱ्या अळ्या, कोबीवरील अळ्या, फळ माश्या, खोडकिडा आदी अनेक किडींवर याचा प्रभाव पडतो. असे विस्तृत मार्गदर्शन कृषीदुतांनी केले. यावेळी कृषि महाविद्यालय रिसोड येथिल विद्यार्थी अक्षय विलास चौधरी, भूषण सुरेश चव्हाण, मयुर शिवाजीराव शेगोकार, तनुज प्रमोद काटे, सिद्धांत प्रमोद खंडारे, महेश गजानन पाटील व शेतकरी सुनील घुगे, केशव काकडे, अर्जुन कोल्हे, गोपाल कोल्हे, दत्तराव जायभाये आणि ओमकार कोल्हे उपस्थित होते. तसेच कृषि महाविद्यालय रिसोडचे प्राचार्य डॉ. आशिष अप्तुरकर सर, तांत्रिक समन्वयक कृषि महाविद्यालय रिसोड आर. एस. डवरे सर, कार्यक्रम समन्वयक प्रा. डी. डी. मसुडकर सर, कार्यक्रम अधिकारी प्रा. आर. वाय. सरनाईक सर तसेच विषय विषेशज्ञ प्रा. बोरकर सर व प्रा. हरणे सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

 

CLASSIFIED जाहिराती फक्त १०० रु. १० दिवस–जाहिरात छोटी मात्र काम मोठे

स्पेशल ऑफर १००० रु जाहिरात १ महिना कॉल ७०२०५७५९३३

Leave a Comment