घरोघरी तिरंगाःसामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहे, निवासी शाळांमध्ये विविध कार्यक्रम

घरोघरी तिरंगाःसामाजिक न्याय विभागाच्या

वसतीगृहे, निवासी शाळांमध्ये विविध कार्यक्रम

सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासनाचे

 

अकोला : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘घरोघरी तिरंगा’ या अभियानात सामाजिक न्याय विभागाच्या आश्रमशाळा, शासकीय शाळा, वसतीगृहे या सर्व ठिकाणी जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन दि.१३ ते १५ ऑगस्ट दरम्यान करण्यात आले आहे,असे सहायक आयुक्त समाज कल्याण डॉ. अनिता राठोड यांनी कळविले आहे.

अमृत महोत्सवी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी आपल्या जीवनाचे बलिदान करणाऱ्या ज्ञात व अज्ञात अशा स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण रहावे यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत घरोघरी तिरंगा  हा उपक्रम देशभरात राबविण्यात येत आहे.

याअंतर्गत सहायक आयुक्त, समाजकल्याण,अकोला कार्यालय व अधिनस्त शासकीय वसतिगृह, अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला-मुलींच्या शासकीय निवासी शाळा तसेच विजाभज आश्रमशाळा, समाजकार्य महाविद्यालय व समतादूत यांचे मार्फत नियोजन करण्यात आले आहे.त्यात रक्तदान शिबिर, समातदूत यांचे मार्फत तयार करण्यात आलेल्या युवा गटा करिता जिल्हास्तरीय प्रशिक्षण केंद्रामध्ये तज्ज्ञ मार्गदर्शकांचे एक दिवशीय मार्गदर्शन शिबिर व चर्चासत्र, विद्यार्थ्यांची  घरोघरी तिरंगा या उपक्रमासाठी जनजागृती मोहिम, देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा,भारतीय स्वातंत्र्य संग्रामावर आधारित लघुनाटय स्पर्धा इ. उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे सर्व कार्यक्रम समाज कल्याण विभागाच्या जिल्ह्यातील सर्व शासकीय वसतीगृह, निवासी शाळांमध्ये  दि.१३ ते १५ दरम्यान दुपारी दोन वाजता होतील, असे  सहायक आयुक्त समाज कल्याण डॉ. अनिता राठोड यांनी कळविले आहे.

Leave a Comment