घरोघरी तिरंगाः जनजागृतीसाठी महिला बालकल्याण विभागाची रॅली

घरोघरी तिरंगाः जनजागृतीसाठी महिला बालकल्याण विभागाची रॅली

अकोला : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राबविण्यात येत असलेल्या घरोघरी तिरंगा या अभियानाच्या जनजागृतीसाठी जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण विभागाच्या वतीने अधिकारी, कर्मचारी, पर्यवेक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची जनजागृती रॅली काढण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या आवारातून सुरु झालेल्या या रॅलीत स्वतः जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, महिला बाल कल्याण सभापती स्फूर्तीताई गावंडे, जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार सहभागी झाले. मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीची सुरुवात करण्यात आली. यावेळी  महिला बालविकास अधिकारी विलास मरसाळे, बाल विकास प्रकल्प अधिकारी चंद्रशेखर चेके,  उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत बाळासाहेब बुटे  तसेच महिला बाल कल्याण  विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

महिला बालविकास विभाग रॅली १ (1)

जिल्हा परिषद आवारातून सुरू होऊन, अशोक वाटिका,नवीन बस स्टँड, गांधीरोड मार्गे पंचायत समिती अकोला येथून आल्यानंतर या रॅलीचा समारोप जिल्हा परिषद आवारात करण्यात आला. सर्वांनी मोहिमेत सहभागी होऊन प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा लावावा असे आवाहन जिल्हा कार्यक्रम अधिकारी मरसाळे यांनी केले. आभार प्रदर्शन जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी प्रकाश गवळी यांनी केले तर रॅलीचे पथ निर्देशन सहा.प्रशासन अधिकारी राजेश खुमकर, सुमेध चक्रनारायण,विस्तार अधिकारी (सांख्यिकी) झिशान अहमद, राम आठवले, अनिल सानप आदींनी केले.

Leave a Comment