घरगुती गणेशोत्सवासाठी आकर्षक सजावट स्पर्धा; वृक्षरोपण व संवर्धनाची विशेष मोहीम

अकोल्यात ‘सामर्थ्य’कडून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संकल्प

– घरगुती गणेशोत्सवासाठी आकर्षक सजावट स्पर्धा; वृक्षरोपण व संवर्धनाची विशेष मोहीम

 

 

 

घरगुती गणेशोत्सवासाठी आकर्षक सजावट स्पर्धा

अकोला : पर्यावरण व जनजागृतीपर आकर्षक देखावा-सजावट स्पर्धा ‘सामर्थ्य’च्यावतीने आयोजित करण्यात आली. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सोबत घेऊन सामर्थ्य फाउंडेशन वृक्षरोपण व संवर्धनाची विशेष मोहीम देखील राबविणार आहे.

 

सामर्थ्य फाउंडेशनच्यावतीने वैविध्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी ‘सामर्थ्य’च्यावतीने विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. गणेशोत्सवात भक्तिभावाबरोबरच पर्यावरणाशी बांधिलकी जपण्यात गणेश भक्तांना प्रोत्साहित करण्यासाठी ‘सामर्थ्य’ने घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेत विविध पुरस्कार देऊन विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. संपूर्ण मातीची गणेशमूर्ती बसवून त्याभोवती पर्यावरणस्नेही साहित्याची सजावट व जनजागृतीपर देखावा करणाऱ्या गणेशभक्तांना या स्पर्धेत सहभागी होता येईल. सर्धेत सहभागासाठी समन्वयक प्रवीण पळसपगार (८७८८२१३२७७) व सुर्यकांत बुडकले (९९७५१७१२७७) यांच्याशी संपर्क साधावा. नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जागरुकता वाढत आहे. गणेशभक्तांनी सजावटीचे अनेक कल्पक मार्ग शोधले आहेत. याच कल्पकतेला चालना देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची माहिती ‘सामर्थ्य’च्यावतीने देण्यात आली.

AKOLA TIMES

सामर्थ्य फाउंडेशनकडून यावर्षी आतापर्यंत दीड हजारावर वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपणाची मोहीम निरंतर सुरूच आहे. आता गणेशोत्सवामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना देखील यात सहभागी करून घेण्यात येणार आहे. गणेशोत्सव मंडळांना नि:शुल्क रोपाचे वाटप करून त्यांना वृक्षारोपण व संवर्धनासाठी प्रोत्साहित केले जाईल. गणेश भक्तांनी उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन सामर्थ्य फाउंडेशनच्या सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे.

संकल्पपत्र भरून घेणार

घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेत सहभागी स्पर्धक पर्यावरणस्नेही उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छूक असल्यास एक वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करण्याचे संकल्पपत्र संस्थेकडे भरून देऊ शकतो. स्पर्धकाला ‘सामर्थ्य’ नि:शुल्क रोपटे उपलब्ध करून देईल.

AKOLA TIMES

Leave a Comment