गणेशोत्‍सव – 2022, मनपाव्‍दारे गणपती विसर्जन घाट सज्‍ज.

गणेशोत्‍सव – 2022

गणेशोत्‍सव – 2022, मनपाव्‍दारे गणपती विसर्जन घाट सज्‍ज.

अकोला दि. 7 सप्‍टेंबर 2022 – दर वर्षी देशासह अकोला शहरात गणेशोत्‍सव उत्‍साहाने साजरा करण्‍यात येतो आणि शेवटच्‍या दिवशी शहरात भव्‍य मिरवणूक काढून गणपती विसर्जन सोहळा ही मोठ्या उत्‍साहाने साजरा करण्‍यात येत असते. या अनुषंगाने अकोला महानगरपालिका प्रशासना व्‍दारा शहरातील सिटी कोतवाली जवळील मुख्‍य गणेश घाट, निमवाडी अनिकट गणेश घाट, हरिहर पेठ गणेश घाट आणि हिंगणा गणेश घाट येथे शहरातील नागरिकांसाठी गणपती विसर्जनासाठी व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. याचसोबत शहरातील विविध भागात स्‍वयंसेवी संघटना व नागरिकांव्‍दारे श्री कुंड (कृत्रिम गणेश घाटांची) व्‍यवस्‍था करण्‍यात येत असते.

AKOLA TIMES

या पैकी सिटी कोवाली मुख्‍य गणेश घाट आणि हरिहरपेठ येथील गणेश घाटांवर मनपा प्रशासनाव्‍दारा श्री कुंड (कृत्रिम गणेश घाटांची) मध्‍ये गणेश मुर्तींचे विसर्जन करण्‍यात येते, असते ज्‍यामध्‍ये फक्‍त लहान गणेश मुर्त्‍यांचा विसर्जन होऊ शकतो, परंतू काही गणेश मंडळांव्‍दारे मोठे गणपतीसुध्‍दा या कुंडांवर विसर्जनासाठी आणण्‍यात येत असते. सदर कुंडांची रुंदी कमी असल्‍याने त्‍यांची क्षमता ही मोठ्या श्री मुर्तीच्‍या विसर्जनाकरिता उपयुक्‍त नसल्‍याने त्‍या मंडळांना मोठ्या प्रमाणात अडचणी व गैरसोय निर्माण होत असते. म्‍हणून अशा गणेश मंडळांनी त्‍यांना होणारी अडचण व गैरसोय लक्षात घेता आप-आपल्‍या सोईनुसार ईतरत्र नदी पात्रात विसर्जन करून अकोला महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्‍यात आले आहे.

—————————————————————————————————————

मनपात राजे उमाजी नाईक जयंती निमित्‍त अभिवादन.

अकोला दि. 7 सप्‍टेंबर 2022 – आज दि. 7 सप्‍टेंबर रोजी सकाळी अकोला महानगरपालिकेच्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुख्‍य सभागृह येथे राजे उमाजी जयंती निमित्‍त आयोजित कार्यक्रमामध्‍ये उपस्थितांच्‍या हस्‍ते राजे उमाजी नाईक यांच्‍या प्रतिमेचे पुजन करून माल्‍यार्पण करण्‍यात आले आहे.

AKOLA TIMES

यावेळी पुर्व झोन क्षेत्रीय अधिकारी तथा कर अधिक्षक विजय पारतवार, देयक विभागाचे कैलास भिरड, अशोक शिरसाट, लक्ष्मण धाडसे, गणेश गावंडे, पेंशन विभागाचे मंगेश जाधव, संजय चव्‍हाण, सतीष वखारीया, राजु कोंडाणे, पंकज देवळे, रामचंद्र केळकर, विश्‍वनाथ सुतवणे, दिपक शिरसाट, जायभाय, आर.एस.पोहरे, अनिल वानखडे, भूषण भेले, मोहन देशमुख, भगवान गायकवाड आदिंची उपस्थिती होती.

स्पेशल ऑफर १००० रु जाहिरात १ महिना कॉल ७०२०५७५९३३

आधुनिक युगात इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आवश्यक – प्रा. पंढरीनाथ मांडवगणे

शिक्षकांनी शिक्षणदानाचे काम व्यवसाय म्हणून न करता ध्येय म्हणून करावे – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

अंगणवाडी केंद्रात ० ते ६ वयोगटातील बालकांचे आधार नोंदणी सुरू

Leave a Comment