अन्न व औषध प्रशासनाची कारवाई;बर्फीचा साठा जप्त करून नष्ट

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई;बर्फीचा साठा जप्त करून नष्ट

            अकोला,दि.6(जिमाका)-  अन्न व औषध प्रशासन, अकोलाव्दारे अकोट तालुक्यातील मे. न्यु सौराष्ट्र हॉटेल अॅण्ड कोल्ड्रींक्स, जवाहर रोड, ता. अकोट, जि.अकोला येथे येथे प्रतिबंधीत अन्न पदार्थ विक्री होत असल्याचे माहिती मिळाली. याआधारावर मे. न्यु सौराष्ट्र हॉटेल अॅण्ड कोल्ड्रींक्स, ता. अकोट येथे सहायक आयुक्त सागर तेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी नितीन नवलकार यांनी तपासणी करुन विक्रेता घनश्याम नारायणदास शर्मा यांचे कडे स्पेशल बर्फी अस्वच्छ परिस्थीतीमध्ये साठविलेला, तसेच लेबल दोष व भेसळीच्या संशयावरून 28 कीलो  5 हजार 600 रुपये किंमतीचा साठा जप्त करून मानवी आरोग्यास अपायकारक असल्या कारणाने नष्ट केला. तसेच मिठाई विक्रेत्याने दुकानात विक्रीसाठी ठेवलेल्या मिठाईच्या ट्रे वरती बेस्ट बिफोर दिनांक नमूद केलेला आढळला नाही. जप्त साठा नमुना विश्लेषणाकरीता प्रयोगशाळेत पाठविला असुन विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अन्न सुरक्षा अधिकारी नितीन नवलकार यांनी दिली.

 

Leave a Comment