दारू पिऊन पोलिस कर्मचाऱ्याचा धिंगाणा ; सेनेने केली तक्रार

दारू पिऊन पोलिस कर्मचाऱ्याचा धिंगाणा ; सेनेने केली तक्रार

गणेशभक्तांना शिवीगाळ,या विरोधात गणेश भक्तांसह सेनेने केली पोलीस अधीक्षक अकोला यांच्या कडे तक्रार

सेनेने केली तक्रार

अकोला शहरातील मोठी उमरी परिसरात अमर एकलव्य गणेश उत्सव मंडळाची गणेश विसर्जन मिरवणूक सुरू होती.यादरम्यान साध्या वेषातील सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी मिरवणुकी स्थळी, दारू पिऊन अश्लील भाषेत शिवीगाळ केली, तसेच बॅंड बंद केले, या सगळ्याचे चित्रीकरण करणाऱ्या गणेश भक्तांचा मोबाईल त्याने हिसकावून घेतला असा आरोप अमर एकलव्य गणेश उत्सव मंडळ व शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांनी केला,

या विरोधात आज दि.12 सप्टेंनबर रोजी अकोल्यातील उमरी येथील अमर एकलव्य गणेश मंडळाच्या भक्तांसह शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गोपाल दातकर व कार्यकर्यांनी अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांना निवेदन दिले असून या पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी करून यांच्यावर कारवाही करण्याची मागणी केलीय. यावेळी केलीय.यावेळी सेनेचे आ.नितीन बापू देशमुख, सेनेचे जिल्हा प्रमुख गोपाल दातकर,सेनेचे पूर्व शहर प्रमुख अतुल पवणीकर , युवा सेनेचे राहुल कराळे, अमर एकलव्य गणेश मंडळाचे अधक्ष्य गणेश टाले, विशाल कपले, दादू दंगले.सह सेनेचे व गणेश मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते

 

Leave a Comment