कोविडःआज ‘तीन’ पॉझिटीव्ह; सात डिस्चार्ज

कोविडःआज ‘तीन पॉझिटीव्ह; सात डिस्चार्ज

        अकोला :  आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 56 अहवाल प्राप्त झाले. त्यात तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, तर सात रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 3 व खाजगी 0)0+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य =एकूण पॉझिटीव्ह 3.

आरटीपीसीआर ‘तीन

आज दिवसभरात  आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात दोन महिला व एका पुरुषाचा समावेश असून तेल्हारा येथील एक तर अकोला मनपा क्षेत्रातील दोन रुग्णाचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

सात जणांना डिस्चार्ज

आज दिवसभरात सात रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

सक्रिय रुग्ण ‘30

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65775(49652+15132+991) आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 30 सक्रिय पॉझिटीव्ह रुग्ण आहेत. यातील नऊ रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत तर 21 जणांना होम आयसोलेशन मध्ये उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

Leave a Comment