मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे खातेवाटप

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे खातेवाटप

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप

मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.

इतर 18 मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे आहेत:

1 ) सर्वश्री राधाकृष्ण विखे-पाटील –

महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास

2) सुधीर मुनगंटीवार-

वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

3) चंद्रकांत पाटील-

उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

4) डॉ. विजयकुमार गावित-

आदिवासी विकास

5) गिरीष महाजन-

ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण

6) गुलाबराव पाटील-

पाणीपुरवठा व स्वच्छता

7) दादा भुसे-

बंदरे व खनिकर्म

8) संजय राठोड-

अन्न व औषध प्रशासन

9) सुरेश खाडे-

कामगार

10) संदीपान भुमरे-

रोजगार हमी योजना व फलोत्पादन

11) उदय सामंत-

उद्योग

12) प्रा.तानाजी सावंत-

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

13) रवींद्र चव्हाण –

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

14) अब्दुल सत्तार-

कृषी

15) दीपक केसरकर-

शालेय शिक्षण व मराठी भाषा

16) अतुल सावे-

सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण

17)शंभूराज देसाई-

राज्य उत्पादन शुल्क

18) मंगलप्रभात लोढा-

पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास

मनपा जाहिरात

Leave a Comment