ब्रेकींग…”देव तारी त्याला कोण मारी” | पुराच्या पाण्यात गाडी सह वाहून जात…….!

ब्रेकींग..

“देव तारी त्याला कोण मारी” | पुराच्या पाण्यात गाडी सह वाहून जात…….!

नदी चा पूल ओलांडणे बेतले होते जीवावर पोहणे होते म्हणून वाचला जीव….”देव तारी त्याला कोण मारी”

मुर्तीजापुर तालुक्यातील मुर्तीजापुर ते शेलु रीनमोचन रोडवरील ब्रम्ही गावा जवळील कमळगंगा नदीच्या पुलावरून पुराचे पाणी वाहत असतांना गुंजवाडा येथील ईसमाने दुचाकीवरुन पाण्यातुन जायचे धाडस केले, यामध्ये उपस्थित नागरिकांसमोर तो इसम मध्यभागी गेला येवढयात तो गाडीसह प्रवाहात वाहु लागला परंतु दैव बलवत्तर तो कसाबसा पोहत सुरक्षित बाहेर निघाला.परंतु दुचाकी वाहुन गेली. या घटनेची माहिती अकोला निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापनाच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांनी देउन तात्काळ रेस्क्यु ऑपरेशन करीता निघायचे आदेश दीलेत लगेचच मुर्तीजापुर उप-विभागिय अधिकारी मोहीते आणी तहसीलदार पवार यांनी फोनवरून माहिती देऊन सांगितले की आंम्ही निघालोत. तेव्हा लगेचच दहा मिनटात तहसीलदार पवार यांचा फोन आला की तो ईसम पोहत पोहत सुखरुप बाहेर निघाला यामुळे आंम्ही रेस्क्यु ऑपरेशन वर जायचे थांबविले. अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दीली.

दारू पिऊन पोलिस कर्मचाऱ्याचा धिंगाणा ; सेनेने केली तक्रार

 

 

 

Leave a Comment