अपंग दोन महिलांना दिला तात्काळ मदतीचा हात!

अपंग दोन महिलांना दिला तात्काळ मदतीचा हात!

अकोला – अकोला जिल्हा परिषद च्या समाज कल्याण विभागात अत्यंत गरीब परिस्थितील अपंग, निराधार, दिव्यांग असलेल्या दोन महिला संगीता फुलंबरकर व किरण दिघेकर या आपल्या लहान मुलीसह अकोट येथून जिल्हा परिषद अकोला येथे आल्यात. त्यावेळी जिल्हा परिषद येथील समाजकल्याण अधिकारी रामेश्वर पुंड यांनी त्यांची चौकशी करून तात्पर्य दाखवत एकाच दिवशी दोन्ही दिव्यांग महिलांचे वीज भांडवलची एका महिलेची १ लाख ५० हजार तर दुसऱ्या महिलेची २ लाख ५० हजाराची केस तात्काळ मंजूर करून दिली.

अकोला जिल्हा परिषद च्या समाज कल्याण विभागात अत्यंत गरीब परिस्थितील अपंग, निराधार, दिव्यांग असलेल्या दोन महिला

त्या दोन्ही महिला अपंग दिव्यांग कल्याण विभागाकडे आणि विचारात बसलेल्या होत्या. ज्यावेळेस समाज कल्याण अधिकारी पुंड यांनी त्यांची विचारपूस केली त्यावेळेस त्या आकोट शहरातील असल्यामुळे त्यांना जिल्हा परिषदेच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेता येणार नाही परंतु वीज भांडवल या योजनेचा लाभ त्यांना देता येऊ शकतो, असे सांगून तात्काळ दोघींचे अर्ज घेऊन दोन्ही अर्ज मंजूर करून दिल्याने ज्या महिला रडत आल्या होत्या त्या जाताना हसत गेल्या ते पाहून जिल्हा परिषद परिसर आवारात उपस्थित असलेल्या बऱ्याच नागरिकांनी समाज कल्याण अधिकारी यांचे कौतुकच केले.

Leave a Comment