बोरगाव मंजू येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपन

बोरगाव मंजू येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपन

अकोला दि.11(जिमाका)- इगतपुरी विश्व विद्यापीठाव्दारे अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू येथे विपश्यना केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. या नियोजीत विपश्यना केंद्रात जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन ध्यान साधना उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

       विश्व विद्यापीठ इगतपुरी द्वारा संपूर्ण जगात ध्यान साधनेचे विपश्यना केंद्र संचालित करण्यात येतात. बोरगाव मंजू येथे मच्छी तलावाच्या बाजूला आठ एकर परिसरात निसर्गरम्य वातावरणात ध्यान साधना केंद्राची निर्मिती करण्यात येणार आहे.  विपश्यना आचार्य नंदकुमार तायडे व वृक्षमित्र श्री. नाथन यांच्या मार्गदर्शनाखाली विपशना केंद्राच्या परिसरात पाचशे वृक्षांची लागवड करण्यात आले. तसेच विपश्यना केंद्राच्यावतीने एकदिवशीय शिबिर आयोजन करण्यात आले.   कार्यक्रमाला बार्शीटाकली नगरपंचायतचे मुख्य अधिकारी शिवहरी थोबे, ज्ञानेश्वर खैरे, रवींद्र पोतदार, सुभाष बियानि, अजय पहुरकर, मधुकर तायडे, आशा तायडे, यशोदा तायडे, मीना पोतदार, दादाराव तायडे, मनोज वानखडे, राहुल थोरात, यांच्यासह असंख्य साधक साधिका उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्र संचालन देवानंद मोहोड यांनी तर आभार प्रदर्शन अजय पाहुरकर यांनी केले.

बोरगाव मंजू येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपन

CLASSIFIED जाहिराती फक्त १०० रु. १० दिवस–जाहिरात छोटी मात्र काम मोठे

स्पेशल ऑफर १००० रु जाहिरात १ महिना कॉल ७०२०५७५९३३

Leave a Comment