बाप्पाच्या मिरवणूकीत हिन्दू-मुस्लीम एकोबाचे दर्शन….

बाप्पाच्या मिरवणूकीत हिन्दू-मुस्लीम एकोबाचे दर्शन

हम सब एक है। मौजे महान येथे बाप्पाच्या मिरवणूकीत हिन्दू-मुस्लीम एकोबाचे दर्शन

सध्या देशात काही समाज विधायक घटका कडुन दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.अशातच मौजे महान येथे मुस्लीम बांधवाणी गणेश विसर्जन मिरवणूकीत मात्र एकोबाचे दर्शन घडवून एक आदर्श निर्माण केला आहे.

बाप्पाच्या मिरवणूकीत हिन्दू-मुस्लीम एकोबाचे दर्शन

बार्शीटाकळी तालुक्यातील महान येथे श्री गणेश विसर्जन मिरवणूक मुस्लीम बांधवांच्या वस्तीच्या परिसरातून  म्हणजेच  मिरवणूक गावातील मुख्य जामा मस्जीद समोरून काढण्यात येते.यावेळी श्री गणेश विसर्जन मिरवणूकीत मुस्लीम बांधवांच्या वतीने गणेश भक्तांचे स्वागताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

गावातील सर्व गणेश विसर्जन मिखणूक ढोल पथक वाद्यांसह नाचत गाजत जल्लोषात गावातील मुख्य जामा भरजीद समोर आली तेव्हा मुस्लिम बांधवांनी गणेश भक्तांचे स्वागत करून सामाजिक धार्मीक एकोप्याचे दर्शन घडवले , गणेश विसर्जन मिरवणूकीत सहभागी असलेल्या आपल्या हिंदू बांधवासाठी कुठली अडचण भासू नये यासाठी मिरवणूक मार्गावर चहा, नाश्ता, पाणी, फळे वितरीत करुण सर्वांचे फुलाने स्वागत.करण्यात आले

सदर कार्यक्रमाचा समारोप होताच सर्व हिन्दू बांधवाचे गळा भेट देऊन हिंदू मुस्लिम भाई भाई च्या नाऱ्याने बाप्पाना निरोप देण्यात आला.

विशेष म्हणजे सहर कार्ययम- अजीज हाफीज सै हसन, साजेब खान. हाफीज, खान सारखान यांनी हिंदू मुस्लिम भाई – भाई एकोप्याचा संदेश देणारा हा  कार्यक्रम आयोजित  होता.सदर कार्यक्रमास पोलीस निरीक्षक अजय वाढवे, प.स. सदस्य, किशोर  देशपांडे, साकार खान माहान चौकी येथील चव्हाण मेजर राठोड़ मेजर. हे प्रमुख पाहुने म्हणून उपस्थीती होती, सदर कार्यक्रमास ग्रामपंचायत महान पांच सुनिल ठोकंकार उपसरपंच अ.रहेमान ग्रामपंचायत कर्मचारी लनविर सालार खान, नजर खान यांची विशेष सहकार्य. लाभले.

Leave a Comment