बंजारा परंपरेतील सर्वात महत्वाचा सण- तिज उत्सव

बंजारा परंपरेतील सर्वात महत्वाचा सण- तिज उत्सव

सिंधू संस्कृतीची परंपरा जपत मातृशक्तीचा गौरव करणारा उत्सव.

भारतीय संस्कृतीत प्रत्येक जाती धर्मातील विविध उत्सव वेगळ्या ढंगाने

भारतीय संस्कृतीत प्रत्येक जाती धर्मातील विविध उत्सव वेगळ्या ढंगाने व परंपरेने साजरे केले जातात त्यामुळेच आपल्या देशातील विविधतेत एकता दिसून येते, इसवी सन पूर्व पासून बंजारा समाजात चालत आलेला सर्वात महत्वाचा तीज उत्सव शहराच्या मोठी उमरी परिसरात नायक प्रेमानंद राठोड यांच्याकडे मोठ्या प्रमाणात साजरा केला गेला…

कधीकाळी डोंगरदऱ्यात राहणाऱ्या बंजारा समाजात तीज म्हणजे आनंदाची पर्वणीच असते. श्रावण महिण्यात ठिकठिकाणी बंजारा तांड्यांवर तीज उत्सवाची पाहायला मिळतो. सध्या तीज उत्सवाच्या बंजारा लोकगीतांनी तिथल्या लोकांवर चांगलच गारुड घातल आहे.

यामध्ये पारंपारिक वेशभूषेत फेर धरून नाचणाऱ्या महिला मुली सहभागी होतात. डोंगरदऱ्यात राहणाऱ्या बंजारा समाजाने आपली वेगळी परंपरा,लोकसंस्कृती आणि वेगळेपण अजूनही जपले आहे.

हे वेगळेपण अगदी चालीरीती, पेहराव आणि बोलीभाषा या सर्वांमध्येच दिसते. तीज हा उत्सव म्हणजे बंजारा समाजाची दिवाळीच, तिज म्हणजे बंजारा समाजाच्या लोकसंस्कृतीचे सर्व पदर आणि पैलू उलगडणारा उत्सव. या उत्सवात दहा दिवसाआधी अविवाहित मुली एका टोपलीत ‘गौरी स्वरूप’ धान (गहू) पेरतात, रोज त्याला पाणी घालून बोलीभाषेत आराध्य देवतांची गीते म्हटली जातात. विसर्जनाच्या दिवशी डोक्यावर ‘गौरी’स्वरूप धान घेऊन वाजत गाजत तांड्याला प्रदक्षिणा केली जाते,

लग्न होऊन सासरी गेलेल्या मुली, महिला तिज उत्सवाच्या निमित्याने माहेरी येतात, त्यामुळे या उत्सवाला वेगळे महत्त्व आहे. महिला प्रधान संस्कृतीचे दर्शन घडवणारा हा उत्सव मातृशक्तीला वंदन करणारा असून, आद्यगण “गण गौर” यांचे महत्व विशद करणारा आहे.

भारतीय संस्कृतीचे पारंपारीक ओळख निर्माण करून देणारे देशातील सर्व सण उत्सव सामाजीक एकतेचा प्रेरणादायी संदेश देणारे आहेत. आणि हा उत्साह दरवर्षी शहरातील मोठी उमरी परिसरातील तांड्याचे नायक प्रेमानंद राठोड यांच्याकडे आयोजित केला जातो. यावेळी मोठया प्रामाणात बंजारा बांधव आणि भगिनीं या उत्सवाला उपस्थित असतात.

आणि दहा दिवस हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. काल या उत्सवाची सांगता झाली. यावेळी नायक प्रेमानंद देवीदास राठोड (खोला), नायकंन – रेखा प्रेमानंद राठोड, कारभारी -लश्मन जाधव, कारभारीन – रूखमाबाई जाधव, आसामी -नारायण चव्हाण, गौकर्णा देवसोत, सविताबाई रणसोत, अनीता खोला (नायकंन, कारंजा), देवीदास खोला (नायक कारंजा), पल्लवी जाधव, कल्पना मेघावत, अंकीता मेघावत, सिंधुबाई पवार, मनीबाई जाधव उपस्थित होते.

Leave a Comment